सध्या जपान दौऱ्यावर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौऱ्याच्या चौथ्या दिवशी जपानमध्ये वास्तव्यास असलेल्या नागपुरकरांशी सकाळी संवाद साधला. जपानच्या दौऱ्यात फडणवीस यांनी चौथ्या दिवशी जपानचे केंद्रीय आर्थिक, व्यापार आणि उद्योग मंत्री यासुतोशी निशिमुरा यांची भेट घेतली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
सकाळच्या सत्रात त्यांनी जपानमध्ये वास्तव्यास असलेल्या नागपूरच्या नागरिकांचीही भेट घेतली व त्यांच्या विषयी गौरोवोद्गार काढले. ते म्हणाले “त्यांच्या अनुभवांतून आणि योगदानातून जपानमध्ये ते यशस्वी होत आहेत, हे पाहून मला अतिशय आनंद झाला. यातील अनेक जण जपानमधील गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात येण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत, याचा मला अभिमान आहे, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले., असे यासंदर्भात प्रसिद्धीला दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमुद केले आहे.
First published on: 24-08-2023 at 21:10 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis interaction with nagpur people in japan cwb 76 ysh