नागपूर : शाळा-शाळांमधून, वर्गावर्गांतून पिढ्या आणि राष्ट्राचे भविष्य घडवणारा म्हणजे शिक्षक. मात्र, एकविसाव्या शतकात शिक्षकाची ही व्याख्याच बदलल्याचे चित्र आहे. नुकतेच नागपूर जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या घेतलेल्या चाचणीत सातव्या वर्गातील विद्यार्थ्यांना इंग्रजीतील ‘इज’, ‘एम’, ‘नो’ हे शब्दही वाचता येत नसल्याचे वास्तव असतानाही विद्यार्थ्यांच्या पायाभूत क्षमतांचा विकास करण्यासाठी सुरू केलेल्या ‘डायट’च्या ‘दिशा’ उपक्रमावर राज्य प्राथमिक शिक्षक समितीने बहिष्काराची भूमिका घेतली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> साप खरंच दूध पितो? जाणून घ्या विविध पारंपरिक अंधश्रद्धा

त्यामुळे शिक्षकांचे हे कुठले विद्यार्थी हित, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय केंद्र पुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत शिक्षकांमार्फत करण्यात येत असलेल्या निरक्षर सर्वेक्षणाच्या कामालाही अशैक्षणिक काम असल्याचे सांगत त्यावरही बहिष्कार टाकला आहे. तसे निवदेनही संघटनेने जिल्हा परिषद अध्यक्षांना दिले. नवीन शैक्षणिक धोरणानुसार पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत इयत्ता तिसरीपर्यंतच्या बालकांना त्या-त्या इयत्तांच्या क्षमता प्राप्त होतील, असे उद्दिष्ट सर्व शाळांना देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या पायाभूत क्षमतांचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग आणि ‘डायट’ने दिशा हा उपक्रम तयार केला आहे. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानानुसार विद्यार्थ्यांचे अ नस्तर निश्चित करण्यात आले आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diet disha workshop boycott by state primary teachers committee dag87 zws