नागपूर :अपंगांना रेल्वेने प्रवास सवलत घेण्यासाठी रांगेत लागून किंवा रेल्वे कार्यालयात जाऊन प्रक्रिया करण्याची गरज आता पडणार नाही. रेल्वे त्यांना डिजिटल ओळखपत्र देणार आहे.

प्रवासी अपंगांना शारीरिक प्रमाणपत्र नेहमी द्यावे लागत होते. डिजिटल ओळखपत्रामुळे त्यांचा हा जास थांबेल. रेल्वेने सवलतीसाठी वापरल्या जाणाऱ्या ओळखपत्र प्रणालीचे संपूर्ण डिजिटायझेशन केले आहे. या डिजिटल ओळखपत्रात क्यूआर कोड असेल. तो इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) च्या ऑनलाइन बुकिंग प्रणालीत तसेच काउंटरवर तिकीट आरक्षणासाठी स्कैन करता येईल. यामुळे अपंग प्रवाशांना वारंवार कागदपत्रे सादर करावी लागणार नाही.

कायमस्वरूपी डिजिटल ओळख

रेल्वेच्या नव्या प्लॅटफॉर्मवर अपंग स्वतःहून ऑनलाइन अर्ज व नूतनीकरण करू शकतात. या ओळखपत्रात एकदा माहिती भरल्यानंतर ते छेडछाड प्रतिरोधक व कायमस्वरूपी डिजिटल स्वरूपात वापरता येईल. याचा रेल्वेच्या डिजिटलमधील सेवेत समावेश आहे. लाखो अपंग प्रवाशांचा प्रवास सोयीचा होणार असून अधिकृत वेबसाईटवर दिव्यांगांना सोय उपलब्ध करून दिल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.

अपंगांना असे लाभ मिळतील

ऑनलाईन अर्ज व नुतनीकरणाची सुविधा राहणार आहे.

सवलत प्रमाणपत्र बाळगण्याची गरज नाही. ऑनलाइन पडताळणी व वेगवान प्रक्रिया केली जाईल. पारदर्शक व सुरक्षित ओळख प्रणाली आहे. क्यूआर कोडद्वारे सोयीस्कर वापर होणार आहे.

अपंगांसाठी रेल्वेने ही एक चांगली सुविधा सुरू केली आहे. नागपूर विभागात दिव्यांगांच्या अर्जावर १०० टक्के डिजिटल ओळखपत्र वितरित ल करण्याचे काम सुरू आहे. याद्वारे गैाकारालाही आळा बसेल, असे मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल म्हणाले.

नोंदणी प्रक्रिया कशी कराल?

अधिकृत दिव्यांगजन पोर्टलवर नवीन वापरकर्ता म्हणून नोंदणी करा. आपले राज्य व जवळचे रेल्वे स्थानक निवडा.
अपंग व रेल्वे सवलत प्रमाणपत्र स्कॅन करून अपलोड करा.
फोटो ओळखपत्र, जन्मतारखेचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो व पत्ता द्या. सर्व माहिती पूर्ण करून अर्ज सादर करा.
अपूर्ण अर्ज ३० दिवसांत पूर्ण करून पुन्हा सादर करता येईल.अर्ज मंजूर झाल्यावर डिजिटल ओळखपत्र डाउनलोड करून घेता येईल.