नागपूर : नागपूर एम्समध्ये कार्यरत एका डॉक्टरने अयोध्येतील राम मंदिरातून आलेल्या अक्षतांचे येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या गाळ्यात वाटप केले. याबाबतची पोस्ट सार्वत्रिक झाल्याने खळबळ उडाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ. मंदार साने असे या डॉक्टरचे नाव आहे. ते एम्सच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागात कार्यरत असून त्यांच्याकडे एम्सचे असोसिएट रजिस्टार म्हणून अतिरिक्त जबाबदारी आहे. साने येथील एम्स नागपूर फॅकल्टी फोरम या संस्थेचेही महासचिव आहेत. राम मंदिराच्या २२ जानेवारी २०२४ रोजी आयोजित उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद आणि इतरही संस्था, कार्यकर्ते देशभरात घरोघरी निमंत्रणाच्या अक्षता देत आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या सेवा शर्थी कायद्यानुसार शासकीय कार्यालय परिसरात अशा पद्धतीने अक्षतांचे वाटप करता येत नाही. त्यानंतरही करायच्याच असतील तर किमान संबंधित संस्था वा कार्यालय प्रमुखांची परवानगी घ्यावी लागते. परंतु, डॉ. साने यांनी विनापरवानगी एम्समधील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या गाळे परिसरात फिरून अयोध्येतून आलेल्या अक्षतांचे वाटप केले.

हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका; शिक्षण संस्थाचालकांचे दहावी, बारावीच्या परीक्षेवर बहिष्काराचे अस्त्र

‘पोस्ट’मध्ये नेमके काय?

एम्समधील परिचारिकांच्या समूहामध्ये सामायिक झालेल्या पोस्टमध्ये डॉ. मंदार साने, परिचारिका ज्योती सिंग दिसत आहेत. त्यात लिहिले आहे की, ‘‘अयोध्येतून आलेल्या अक्षता एम्समध्ये वितरित करण्याचे सौभाग्य मिळाले. आम्ही खूप भाग्यवान आहोत. सियावर रामचंद्र की जय, जय श्रीराम, अयोध्येतील मंदिराची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी २०२४’’

हेही वाचा – ‘टीसीएस’ कंपनीच्या कर्मचाऱ्याचे नातलग गुणवत्ता यादीत

अधिकारी काय म्हणतात?

या विषयावर डॉ. मंदार साने म्हणाले, एम्स परिसरातील मंदिरात अयोध्येतील अक्षता आल्या. देशाच्या विविध भागांप्रमाणे एम्सच्या गाळ्यातही त्या वाटल्या. परिचारिका ज्योती सिंग यांनी अक्षता मिळाल्याचे सांगितले. एम्सचे प्रभारी संचालक डॉ. हनुमंत राव म्हणाले, मी मदुराईला असून मला याबाबत माहिती नाही. शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. मृणाल पाठक म्हणाल्या, डॉ. साने यांना शासकीय परिसरात अक्षता वाटता येत नसल्याचे सांगितले. त्यांनी काही मित्रांना अक्षता वाटल्याचे मान्य केले. त्यावर त्यांना अक्षता वाटायच्या असल्यास मित्रांच्या खासगी निवासस्थानी जाऊन देण्यास सांगण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Distribution of akshatas of ayodhya invitation in residential blocks of aiims nagpur mnb 82 ssb