नागपूर : वाघाच्या मृतदेहाचे तब्बल १४ तुकडे आढळल्याने खळबळ

पवनगाव परिसरात गुराख्याला दुर्गंधी आल्याने त्याने पाहणी केली असता नाल्याच्या पाण्यात वाघाचा समोरचा भाग दिसला.

नागपूर : वाघाच्या मृतदेहाचे तब्बल १४ तुकडे आढळल्याने खळबळ
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी महिला ठार

वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरील पवनगाव झुडपी जंगल परिसरातील नाल्यात वाघाच्या मृतदेहाचे तब्बल १४ तुकडे आढळल्याने खळबळ उडाली आहे. यात वाघाची नखे, मिशा, दात हे अवयव मात्र गायब आहेत.

पवनगाव परिसरात गुराख्याला दुर्गंधी आल्याने त्याने पाहणी केली असता नाल्याच्या पाण्यात वाघाचा समोरचा भाग दिसला. तर आजूबाजूला काही अवयव आढळून आले. गुराख्याने तात्काळ वनखात्याला माहिती दिली. त्यानंतर वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

सर्व १४ तुकडे जमा करून पाहणी केली असता पायाची नखे, मिशा गायब होते. तर जबड्याचा काही भाग कापलेला होता. केवळ चार दात होते. या वाघाची शिकार ६ ते ७ दिवसांपूर्वी झाली असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. वनखात्याने घटनेची चौकशी सुरू केली आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
देशात लवकरच आणखी एक हत्ती अभयारण्य; तमिळनाडूतील अगस्तियामलाईला मान्यता
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी