यवतमाळ : अनंतपूर येथील ‘किया’ मोटर्स इंडिया लिमिटेडची डीलरशिप देण्याचा बनाव करून व्यापार्‍याला आठ लाख ३६ हजार रुपयाने गंडा घालण्यात आला.  याप्रकरणी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. संदीप प्रेमचंद छाजेड ४८, रा. धामणगाव रोड, यवतमाळ), असे फसवणूक झालेल्या व्यापार्‍याचे नाव आहे. फसवणूक प्रकरणी माणिक पटनायक (रा. अनंतपूर), असे गुन्हा नोंदविण्यात आलेल्या तोतयाचे नाव आहे. व्यापार्‍याने एप्रिल महिन्यात किया इंडिया कंपनीकडे डिलरशीपसाठी अर्ज केला होता. त्यामध्ये सांगण्यात आलेल्या सर्व कागदपत्रे व अटींची पूर्तता केली. त्यानंतर छाजेड यांना एका मोबाइल क्रमांकावरून फोन आला. ऑनलाइन अर्ज मंजूर झाल्याचे सांगण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दोन जून रोजी मेलदेखील प्राप्त झाला. २८ जूनरोजी पुन्हा फोन आला. अनंतपूर येथील बँक खात्यात नोंदणी फी म्हणून एक लाख ४९ हजार ५०० रुपये टाकावयास लावले. व्यापार्‍याने ही रक्कम आरटीजीएस केली. तीन जुलै रोजी पटनायक याने अ‍ॅग्रीमेंटसाठी सहा लाख ८७ हजार ३०० रुपयाचा भरणा करायला लावला. ही रक्कमही आरटीजीएसद्वारे बँक शाखेतून पाठविली. सात जुलै रोजी डीलर परवाना तयार होईल व त्यासाठी शुल्क भरणा करण्यासाठी तगादा लावण्यात आला. तोतयाने ऑनलाइन फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर संदीप छाजेड यांनी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून माणिक पटनायक याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास ठाणेदारांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.

व्यापार्‍याने गाठले अनंतपूर

पैशाचा वारंवार तगादा लावण्यात येत असल्याने व्यापारी संदीप छाजेड यांच्या मनात शंका आली. त्यांनी स्वत: अनंतपूर येथील कंपनी गाठली आणि घडलेला प्रकार त्यांना सांगितला. पटनायक नावाचा व्यक्ती कामाला नाही, आणि केआयएइंडीया प्रा. लि. नावाचे इंडियन ओवरसीस बँकेत कोणतेही खाते नसल्याने स्पष्ट केले. त्यामुळे फसवणूक करण्यात आल्याची बाब व्यापार्‍याच्या लक्षात आली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Extortion of eight lakhs in the name of giving dealership kia motors nrp 78 ysh