नागपूर : एका नराधम बापाने स्वत:च्याच दोन मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. ही घटना सोमवारी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी नराधम बापाला अटक केली असून त्याने बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची कबुलीही दिली आहे.

हेही वाचा >>> “…तर राजकारणातून संन्यास घेणार,” विजय वडेट्टीवार यांची घोषणा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित महिलेची गेल्या १५ वर्षांपूर्वी ओळख झाली होती. त्यावेळी ती विवाहित होती. तिला पतीने सोडल्यानंतर ती आईकडे परतली होती. दरम्यान आरोपीने तिला लग्नाची मागणी घातली. दारुडा असलेल्या आरोपीशी तिने लग्न केले. त्यांना दोन मुली आणि दोन मुले झाली. त्यात सर्वात मोठी मुलगी १३ तर लहान मुलगी ही १० वर्षांची आहे. मोठ्या मुलीवर बापाची वाईट नजर गेली. तो वारंवार तिच्याशी अश्लील चाळे करीत होती. परंतु, बाप असल्यामुळे ती गप्प होती. एप्रिल महिन्यात आरोपीने घरी कुणीही नसताना मोठ्या मुलीशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतरही तो तिचे लैंगिक शोषण करीत राहिला.

हेही वाचा >>> ‘एक्झिट पोल’ झाले, उद्या ‘एक्झाट पोल’, प्रतापराव जाधवांचा विक्रमी विजय, की खेडेकर ‘जायंट किलर’ ठरणार?

बापाचा लैंगिक अत्याचार सहन न झाल्याने मुलीने याबाबत आईला सांगितल्यावर तिने नवऱ्याशी भांडण केले. दरम्यान त्याने माफी मागून यापुढे असे कधीही होणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे पत्नीने कुठेही वाच्यता केली नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्याने मोठ्या मुलीसह लहान असलेल्या मुलीशीही अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. मोठ्या मुलीशीही तो अश्लील चाळे करीत होता. रविवारी दुपारी मोठ्या मुलीला बाप लहान बहिणीशीही अश्लील चाळे करताना दिसला. रडत असलेल्या बहिणीला तिने नराधम बापाच्या तावडीतून सोडवले आणि बाहेर आणले. तिची समजूत घातली. बापाने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मोठ्या मुलीने आईला दिली. त्यामुळे तिचा पारा चढला. तिने याबाबत गिट्टीखदान पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करीत आरोपी पित्याला अटक केली.