बुलढाणा : खामगाव शहरात आज, बुधवारी लागलेल्या आगीत दोन दुकानांतील लाखोंचे साहित्य खाक झाले. तीन ठिकाणच्या अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांनी ही आग नियंत्रणात आली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
टिळक मैदान परिसराला लागून असलेल्या एका दुकानाला प्रारंभी आग लागली. पाहता पहाता या आगीने रौद्ररूप धारण केल्याने बाजूच्या दुकानालाही आग लागली. टिळक मैदान परिसरातील दुकानांच्या पाठीमागे कचऱ्याचे ढिगार असून या कचऱ्याला काहीजण आग लावून पेटवून देतात. त्यातून आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
हेही वाचा – १२ वर्षांपासून फरार, नंतर आत्मसमर्पण, कारण ऐकल्यावर बसेल धक्का
सुहाग बँगल्स अँड कॉस्मेटिक ज्वेलरी या दुकानाला आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर बाजूच्याच मेडिकलच्या दुकानाला ही आग लागली. खामगावसह शेगाव आणि नांदुरा येथील अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविले.
First published on: 04-10-2023 at 16:47 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire to two shops in khamgaon scm 61 ssb