Premium

नागपूर : पंतप्रधानांच्य हस्ते भूमिपूजन, तरीही उड्डाण पुलाला ९ वर्षांचा विलंब, उद्या होणार वाहतुकीसाठी खुला

नागपूर उड्डाण पुलाचे शहर, जुने पुल तोडले जातात. नवीन बांधले जातात. काहींची कामे पूर्ण होते. काही वर्षानुवर्षे अपूर्ण राहतात. नागपुरातील पारडीतील उड्डाण पूल हा अशा रेंगाळलेल्या पुलांपैकीच एक.

Flyover at Pardi
पंतप्रधानांच्य हस्ते भूमिपूजन, तरीही उड्डाण पुलाला ९ वर्षांचा विलंब, उद्या होणार वाहतुकीसाठी खुला (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

नागपूर : नागपूर उड्डाण पुलाचे शहर, जुने पुल तोडले जातात. नवीन बांधले जातात. काहींची कामे पूर्ण होते. काही वर्षानुवर्षे अपूर्ण राहतात. नागपुरातील पारडीतील उड्डाण पूल हा अशा रेंगाळलेल्या पुलांपैकीच एक. विशेष म्हणजे २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुलाचे भूमिपूजन झाले होते. ९ वर्षांच्या प्रदीर्घ विलंबानंतर या पुलाचा काही भाग मंगळवारी १८ सप्टेंबरनंतर वाहतुकीसाठी खुला होतो आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी पारडी येथील उड्डाणपुलाची पाहणी केली. या उड्डाणपुलाच्या चारपैकी तीन बाजूंचे काम पूर्ण झाले असून येत्या १९ तारखेपासून तीन बाजू वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येणार आहेत.

हेही वाचा – उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या आश्वासनानंतरही ओबीसी मोर्चावर ठाम का आहेत? शिंदे, फडणवीस यांनी काय संभ्रम निर्माण केला?

हेही वाचा – पंतप्रधान मोदींचा वाढदिवस गोंदियात ‘राष्ट्रीय बेरोजगार दिन’ म्हणून साजरा, सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी…

पारडी उड्डाणपूल प्रकल्प वेळेत पूर्ण होत नसल्याची अनेक कारणे दिली जात आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आवश्यक असलेली जमीन वेळेत उपलब्ध करून देण्यात आली नाही. १.१८ हेक्टर जागेवर उड्डाणपूल बांधण्यासाठी महापालिका, राज्य सरकार आणि मेट्रो विभागाकडून मंजुरी मिळण्यास विलंब झाला. पुलाच्या बांधकामादरम्यान वाहतुकीची समस्याही एक कारणीभूत ठरली. याशिवाय भूमिगत जलवाहिनी, इलेक्ट्रिक केबल, बीएसएनएल केबल, सीवरेज लाईन आदींचे नियोजन करण्यास बराच कालावधी लागला आहे. पुलाचे ३.५ किमी आणि ७.५ किमी. दोन सिमेंट रस्ते तयार आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Flyover at pardi in nagpur will be open for traffic cwb 76 ssb

First published on: 18-09-2023 at 13:31 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा