भंडारा : भंडारा-पवनी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार रामचंद्र अवसरे यांचे आज, शनिवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास लक्ष हॉस्पिटल, भंडारा येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, भाऊ असा मोठा परिवार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रविवारी दुपारी ३ वाजता पवनी येथील वैजेश्वर मोक्षधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. रामचंद्र अवसरे २०१४ ते २०१९ या काळात भंडारा-पवनी विधानसभा मतदार संघातून भाजपाच्या तिकीटावर विधानसभेवर निवडून गेले होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former bhandara mla ramchandra avasare passed away ksn 82 amy