चंद्रपूर : वेकोली चंद्रपूर परिसरातील डीआरसी ३ व ४ अंतर्गत ५० टन इलेक्ट्रॉनिक वजनकाट्याच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांनी व वेकोलीच्या दोन कर्मचाऱ्यांनी मिळून इलेक्ट्रॉनिक वजनकाटा चीपच्या माध्यमातून हेराफेरी करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घोटाळा केल्याचे प्रकरण उघडकीस आले असून डीआरसीचे रैय्यतवारीचे उपप्रादेशिक व्यवस्थापक दक्षिणामूर्ती वेदागिरी यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी चार जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा…राज्यातील वैद्यकीय संशोधनाचे ‘चक्र’ गतिमान होणार

यामध्ये बिलासपूर येथील आर.आर इंजिनिअर्स एड कॅस्टलेटंटचे वे ब्रिज सर्व्हिस इंजिनीअर उमेश शुक्ला, त्याचा सहाय्यक मुकेश अंद्ररस्कर, डीआरसी चंद्रपूर क्षेत्राचे टेलिफोन लाइन मॅन अजितसिंग गौतम आणि लिपिक राजेश यादव यांचा समावेश आहे. रैय्यतवारीचे उपप्रादेशिक व्यवस्थापक दक्षिणामूर्ती वेदागिरी यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, वेकोलिचे ६० टन भंगार उचलण्याचे कंत्राट फैज ट्रेडर्स, पडोळी यांना देण्यात आले आहे. दरम्यान वेकोलिच्या पाच सदस्यीय समिती ८ ऑगस्ट रोजी वजन काटा तपासण्यासाठी गेली असता त्यांना वाहनाचे वजन ६ हजार ६८० किलो कमी असल्याचे आढळून आले.

दरम्यान गाडीचे वजन कमी भरल्याने वे ब्रिज सर्व्हिस इंजिनीअर उमेश शुक्ला यांना चौकशीसाठी बोलाविले असता, त्यांने चौकशी करून वजन काटा योग्य असल्याचे लिखीत स्वरूपात दिले. पुन्हा दुसऱ्या दिवशी ९ ऑगस्ट रोजी डीआरसी ३ चा वजन काटा तपासणी करण्यात आला. तेव्हा इलेक्ट्रॉनिक वजन काट्यात वाहनाचे वजन २४.०८० टन आले. त्यामुळे वनजकाट्यात छेडछाड झाल्याचा संशय आल्याने वजन काट्याची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान, डीआरसी ४ च्या इलेक्ट्रॉनिक वजन लोड सेल केबलवर एक इलेक्ट्रॉनिक चिप बसवलेली आढळून आली. या चिपमुळे वाहनाचे वजन कमी मोजण्यात येत होते. दरम्यान १६ जुलै २०२४ रोजी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात वे ब्रिज सर्व्हिस इंजिनीअर उमेश शुक्ला, त्याचा सहाय्यक मुकेश अंद्ररस्कर, डीआरसी चंद्रपूर क्षेत्राचे टेलिफोन लाइन मॅन अजितसिंग गौतम आणि लिपिक राजेश यादव हे चारही जण इलेक्ट्रॉनिक वजनाच्या काट्यांशी छेडछाड करतांना व चीप लावून त्यांचे वजन कमी करताना आढळून आले. यामुळे वेकोलीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान तक्रारीवरून पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

हेही वाचा…बुलढाणा: पत्नीला न वाचवता झोपी गेलेल्या पतीला तीन वर्षांची शिक्षा

काट्यात फेरफार!

पडोली येथील फैज ट्रेडर्स ६० टन भंगार उचलण्याचे काम मिळाले होते. मात्र, वेकोलीचे कर्मचारी कंत्राटदार फैज ट्रेडर्स ला फायदा पोहोचविण्यासाठी वजन काट्यात चीप लावली का?, वेकोलीच्या कर्मचाऱ्यांना आमिष दाखविण्यात आले का? यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, या प्रश्नांची उत्तरे अद्यापही मिळालेली नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four accused arrested for manipulating weighing machine chip causing crores of rupees loss in chandrapur rsj 74 psg