नागपूर : छत्रपती चौकात राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीने ‘ऑनलाईन गेम’च्या नादात यापूर्वी दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तिसऱ्या प्रयत्नात तिने जर्मन आणि इंग्रजी भाषेत ‘सुसाईड नोट’ लिहून आत्महत्या केली. या मुलीच्या आत्महत्येमुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्विटी (बदललेले नाव) ही बाराव्या वर्गाची विद्यार्थिनी असून तिचे वडील बँकेत व्यवस्थापक आहेत. तिच्या आईने तहसीलदार पदावरुन स्वेच्छा निवृत्ती घेतली. आईवडिलांना एकुलती असलेल्या स्विटीला ऑनलाईन मोबाईल गेम खेळण्याचा नाद होता. अभ्यासात हुशार असलेली स्विटी ही विदेशी संस्कृतीवर नेहमी लिखाण करीत होती. तसेच ‘आफ्टर डेथ’ हा शब्द नेहमी गुगलवर सर्च करीत होती. मोबाईल गेमनेच अखेर तिचा घात केला.

यापूर्वी तिने दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते अपयशी ठरले. डिसेंबर २०२४ मध्ये तिने युरोप-अलास्कावरुन ऑनलाईन कुऱ्हाड बोलावली होती. त्याने स्वत:च्या हातावर ‘क्रॉस’चे निशान बनवले आणि नंतर स्वत:चा गळा चिरुन आत्महत्या केली. पहाटेच्या सुमारास तिची आई तिच्या खोलीत गेल्यामुळे ही घटना उघडकीस आली. तिने आत्महत्या करण्यापूर्वी जर्मन भाषेत ‘सुसाईड नोट’ लिहिली होती. त्यात लिहिले होते की, माझ्यावर युरोपच्या जंगलातील एका पहाडावर अंत्यसंस्कार करा. तसेच ते शक्य न झाल्यास अमेरिकन तलाव किंवा अरब समुद्रात माझा मृतदेह टाका. मानवांनी पृथ्वी आणि पर्यावरणाला बरीच हानी पोहोचवली आहे. माझ्या मृत्यूनंतर माझा एकही फोटो घरात ठेवू नका. अशा प्रकारचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे.

पोलिसांकडून गोपनीयता

स्विटीने आत्महत्या केल्याचे प्रकरण सोमवारी सकाळी उघडकीस आले होते. मात्र, पोलिसांनी या प्रकरणात प्रसारमाध्यमांना कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास मनाई केली. तसेच या प्रकरणात धंतोली ठाणेदार, सहायक पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्तसुद्धा एक शब्द बोलत नव्हते. भविष्यात कोणत्याही मुलीने अशाप्रकारचे पाऊल उचलू नये म्हणून या प्रकरणात अत्यंत गोपनीयता बाळगल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl student suicide online game german language suicide note nagpur case adk 83 ssb