नागपूर: हल्ली विषाणू संक्रमणामुळे बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात रुग्णालयांत दाखल होत असून त्यांचा आजारपणाचा तसेच त्यानंतर अशक्तपणा जाणवण्याचा कालावधी वाढत आहे. या संक्रमनाला एच-३ एन-२ हा विषाणूही कारणीभूत असण्याची शक्यता आहे, अशी माहिती ज्येष्ठ श्वसनरोगतज्ज्ञ व विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अशोक अरबट यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>चंद्रपूर : महिलेवर हल्ला करून बिबट्याचा चक्क घरातच ठिय्या

एच-३, एन-२ हा ‘इंफ्लुएंजा’ ए  विषाणूचा उपप्रकार असून १९६८ मध्ये त्याची साथ आली होती. त्यामध्येही दहा लाख लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. आयसीएमआरने हा  ‘एच- ३ एन- २’ विषाणुमुळे विकार होत असल्याचे स्पष्ट केले आहे. हा कोविड सारखा ड्रॉपलेटच्या माध्यमातून पसरणारा व्हायरस असून रुग्णांच्या संपर्कात आल्यानंतर एक ते चार दिवसात याची लक्षणे दिसतात. कफ,ताप, गळ्याला सुज, सर्दी, अंगदुखी, थंडी वाजणे, अंग थरथरणे, अशक्तपणा आणि विशेषतः लहान मुलांमध्ये उलटी व हगवण अशी लक्षणे आहेत.

हेही वाचा >>> नागपूर : “शिंदे-फडणवीस धनाजी-संताजीची जोडी, उध्दव ठाकरेंनी..,” चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल!

सहव्याधी असणारे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं आणि उपचारांमुळे रोग प्रतिकारशक्ती कमी झालेले रुग्ण यांना या विकाराचा सर्वाधिक धोका असून प्रसंगी न्युमोनिया सारखी गुंतागूंत होऊ शकते, श्वसनप्रणाली बंद पडू शकते आणि जीव जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. एच-३ एन- २ व्हायरसमुळे होणाऱ्या विकारावर ओसेल्टॅमिवीर, झॅनामावीर  सारखी ॲण्टीव्हायरल औषध प्रभावी आहेत.  याशिवाय भरपूर पाणी पिणे, विश्रांती  घेणे आवश्यक आहे.  श्वास घेण्यास त्रास होत असेल, छातीत दुखत असेल, डिहायड्रेशन झाले तर रुग्णालयात दाखल होणे आवश्यक आहे. याशिवाय हृदयविकार, मधूमेह, उच्चरक्तदाब, किडनीचे विकार आणि अन्य सहव्याधी असल्यास अधिक काळजी घेणे व अस्वस्थ वाटल्यास तातडीने वैद्यकीय सहाय्यता घेणे क्रमप्राप्त आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: H3n2 virus risk more in comorbidities says pulmonologist dr ashok arbat mnb 82 zws