बुलढाणा: आज जाहीर झालेल्या इयत्ता बारावीच्या निकालात बुलढाणा जिल्ह्याने बाजी मारली असून अमरावती विभागात बुलढाणा द्वितीय ठरला आहे. नेहमीच्या अलिखित नियमाप्रमाणे निकालात मुलींचा डंका वाजला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील ३३ हजार ५९ विद्यार्थ्यांनी  नोंदणी केली होती. त्यातील ३२ हजार  ८७२  जणांनी परीक्षा दिली. त्यापैकी ३० ४५२ उत्तीर्ण झाले आहे.  जिल्ह्याची टक्केवारी ९२.६३ इतकी आहे.  मुलींची टक्केवारी मुलांच्या तुलनेत सरस असून ९४.४५ टक्के मुली यशस्वी ठरल्या आहे. परीक्षा देणाऱ्या १४ हजार ५८९ पैकी १३ हजार ७८० मुली उत्तीर्ण झाल्या आहे. मुलांची टक्केवारी ९१.१८ इतकी असून १६ हजार ६७२ मुले उत्तीर्ण झाले आहेत. बुलढाणा जिल्हा अमरावती विभागात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hsc result 2023 buldhana district in second place in in amravati division scm 61 zws