नागपूर : रेल्वेच्या तिसऱ्या मार्गाचे सुरू असलेले काम आणि पाऊस यामुळे अनेक गाड्या सतत विलंबाने धावत असून आता हावडा-पुणे-हावडा एक्सप्रेस तसेच हावडा-मुंबई मेल रद्द करण्यात आली आहे. २८ जुलैला हावडा येथून निघणारी १२८१० हावडा-मुंबई मेल एक्स्प्रेस रद्द झाली आहे. तसेच २८ जुलैला हावडा येथून निघणारी १२१३० हावडा-पुणे आझाद हिंद एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
या दोन्ही गाड्या २९ जुलैला नागपुरात येणार नाहीत. १२१५२ शालिमार-कुर्ला एक्स्प्रेस २८ जुलैला शालिमारहून चार तास उशिराने निघेल. १२९०६ शालिमार-पोरबंदर एक्स्प्रेस २८ जुलैला शालिमारहून सुटणार असून तीही उशिराने निघेल. २८ जुलैला पुण्याहून सुटणारी १२१२९ पुणे-हावडा आझाद हिंद एक्सप्रेस सात तास उशिराने सुटणार आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या अनेक गाड्या उशिरा धावत आहेत, असे रेल्वेने कळवले आहे.