अकोला : शहरातील रहिवासी मुलीला पाहुणे पाहायला येणार होते. घरात सर्व तयारी सुरू असताना मध्यरात्रीच्या सुमारास मुलगी घरातून अचानक बेपत्ता झाली. तिला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा आरोप पालकांनी केला असून खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पालकांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, १७ वर्षीय मुलीला १४ डिसेंबर रोजी पाहुणे पाहायला येणार होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : वंदे भारत एक्स्प्रेसमधून असा होईल सुगंधित प्रवास, मध्य रेल्वेची नाविन्यपूर्ण योजना

रात्री उशिरापर्यंत घरात सर्व तयारी सुरू असताना, मुलगी रात्री २ वाजताच्या सुमारास घराच्या मागील दरवाजातून बेपत्ता झाली. तिचा नातेवाईक, मैत्रिणींकडे शोध घेतला असता, ती आढळून आली नाही. तिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले, असे नमूद आहे. या प्रकरणात खदान पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, मुलीचा शोध घेण्यात येत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In akola girl ran away from home when guests came to see her for marriage purpose ppd 88 css