Premium

ओबीसी समाजाच्या न्यायिक मागणीसाठी अन्नत्याग, आंदोलनाचा दुसरा टप्पा; चिमूर क्रांती भूमीतून सुरुवात

राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे तालुका अध्यक्ष अक्षय लांजेवार व अजित सुकारे यांचे आंदोलन सुरू झाले आहे.

chandrapur obc hunger strike, obc leader on hunger strike in chimur
ओबीसी समाजाच्या न्यायिक मागणीसाठी अन्नत्याग, आंदोलनाचा दुसरा टप्पा; चिमूर क्रांती भूमीतून सुरुवात (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

चंद्रपूर : ओबीसींच्या न्याय मागण्या अद्यापही मान्य न झाल्याने राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने चिमूर क्रांतीभूमीतून ७ डिसेंबरपासून राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे चिमूर तालुका अध्यक्ष अक्षय लांजेवार व अजित सुकारे यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू झाले आहे. चंद्रपूर येथे ओबीसींच्या मागण्यांसाठी रविंद्र टोंगे, विजय बल्की आणि प्रेमानंद जोगी यांनी ११ सप्टेंबर पासून आंदोलन सुरू केले होते. दरम्यान, ओबीसींच्या शिष्टमंडळासोबत शासनाच्या झालेल्या चर्चेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० सप्टेंबरला चंद्रपुरात येऊन अन्नत्याग आंदोलन आश्वासन देऊन सोडविले होते. परंतु ओबीसींच्या न्याय मागण्या अद्यापही मान्य झाल्या नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने चिमूर क्रांतीभूमीतून ७ डिसेंबर पासून राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे तालुका अध्यक्ष अक्षय लांजेवार व अजित सुकारे यांचे आंदोलन सुरू झाले आहे. चिमूर नगरीचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराज यांचे दर्शन घेऊन रॅलीच्या माध्यमातून अन्नत्याग आंदोलक अक्षय लांजेवार व अजित सुकारे यांना तहसील कार्यालयाच्या बाजूला उपोषण मंडपात उपोषणाला बसविण्यात आले.

हेही वाचा : “आरक्षण मिळू द्या, मग भुजबळांना बघतो”, मनोज जरांगे यांचा इशारा

यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय महासचिव सचिन रांजूरकर, राज्य उपाध्यक्ष डॉ सतीश वारजूकर, ओबीसी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शाम लेडे, राष्ट्रीय ओबीसी प्रदेश कार्याध्यक्ष दिनेश चोखारे, दिनेश कष्टी, माधव डूकरे, अशोक सोनटक्के, मारोती अतकरें, चिमूरचे तालुकाध्यक्ष उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In chandrapur obc leader starts hunger strike from chimur to save obc reservation rsj 74 css

First published on: 07-12-2023 at 19:57 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा