यवतमाळ : गेल्या काही दिवसांपासून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात मराठा आरक्षणावरून संघर्ष सुरू आहे. आज गुरुवारी उमरखेड येथे आयोजित सभेत मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला एकदा आरक्षण मिळू द्या, त्यानंतर छगन भुजबळ यांना बघतो, असा थेट इशारा दिल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : संपत्तीच्या वादातून आजी-आजोबांसह नातीची गळा चिरुन हत्या?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यात छगन भुजबळ यांच्यासारखा दुसरा कलंकित मंत्री असूच शकत नाही, अशी टीका करून जरांगे यांनी भुजबळ यांच्यासारखा ज्येष्ठ मंत्री, गोरगरीब मराठ्यांच्या मुलांना मिळणाऱ्या आरक्षणात आडवा येत असेल तर त्यांना आपण एकटेच पुरून उरतो. फक्त मराठा समाजाने विश्वास ठेवावा, असावं आवाहन केले. जरांगे यांनी छगन भुजबळ यांना थेट इशारा दिल्याने मराठा व ओबीसी कार्यकर्त्यांत जुंपण्याची शक्यता आहे.
कोणत्याही स्वरूपात हिंसक आंदोलन करू नका. छगन भुजबळ यांच्या नादी लागू नका, असे आवाहनही जरांगे यांनी या सभेत केले. २४ डिसेंबर हा मराठ्यांच्या विजयाचा दिवस असेल, असेही जरांगे म्हणाले. सभेला हजारो मराठा बांधव उपस्थित होते.