नागपूर : लाचखोरीची कीड प्रत्येक शासकीय कार्यालयाला लागली असून गेल्या वर्षभरात नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ७५ सापळा कारवाई केली आहे. या सापळा कारवाईत ११६ लाचखोर शासकीय अधिकारी-कर्मचारी लाच घेताना अडकले आहेत. लाचखोरांमध्ये सर्वाधिक तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शासकीय कार्यालयात कोणत्याही प्रकारचे काम असल्यास सामान्य नागरिकांना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो. कायदेशिर असलेल्या कामांसाठीसुद्धा चिरीमिरीची मागणी काही अधिकारी-कर्मचारी करतात. उत्पन्नाच्या दाखल्यापासून ते जातीच्या दाखल्यापर्यंत किंवा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यापासून ते गुन्ह्यांचा तपास करण्यापर्यंत सामान्य नागरिकांना लाच दिल्याशिवाय काम न झाल्याचा अनुभव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : अकोल्यातील संभाव्य पोटनिवडणूक लढण्याची वंचितची तयारी

तलाठी कार्यालयापासून ते जिल्हाधिकाऱ्यापर्यंत तसेच पोलीस ठाण्यापासून ते पोलीस आयुक्तालयापर्यंत काही कर्मचारी लाच घेतल्याशिवाय काम करीत नाहीत. त्यामुळे लाचखोरीला सामान्य जनता कंटाळलेली असते. शासकीय कार्यालयाच्या वारंवार चकरा मारून थकल्यानंतर नाईलाजास्तव लाच देण्याची तयारी होते. गेल्या वर्षभरात नागपूर परीक्षेत्रात दीडेशेवर तक्रारी आल्यानंतर ७५ तक्रारीत तथ्य आढळ्याने लाच मागितल्याप्रकरणी सापळा कारवाई करण्यात आली. यामध्ये ११६ शासकीय अधिकारी-कर्मचारी लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. यामध्ये सर्वाधिक लाचखोर महसूल विभाग, पोलीस विभाग, परीवहन विभाग, पंचायत समिती, ग्रामपंचायत, वीज विभाग, जिल्हा परीषद आणि आरोग्य विभागातील आहेत.

हेही वाचा : धक्कादायक! विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात, ग्रामसेवकाकडून दहा हजारांची…

‘एसीबी’चा वचक झाला कमी

सध्या अनेक शासकीय कार्यालयात लाच दिल्याशिवाय काम होत नसल्याची ओरड आहे. मात्र, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्यभरात ७९५ सापळा कारवाई करीत ११०९ लाचखोरांवर कारवाई केली. तर नागपूर परीक्षेत्रात केवळ ७५ सापळा कारवाई केली आहे. शासकीय कार्यालयात कर्मचारी बिनधास्तपणे लाच मागत असल्याचे चित्र आहे. त्यावरून ‘एसीबी’चा पूर्वीसारखा वचक नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

शहर – लाचेची कारवाई

नागपूर – २५
वर्धा – ०९
गोंदिया – १२
गडचिरोली – ०९
भंडारा – ०७
चंद्रपूर – १२

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur 116 officers and employees caught red handed while taking bribe adk 83 css