नागपूर : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका व संघस्थापनेच्या शतकोत्तर वर्षाची तयारी या पार्श्वभूमीवर उद्या मंगळवारी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध संगीतकार व गायक पदमश्री शंकर महादेवन उपस्थित राहणार आहेत. उद्या होणाऱ्या कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत स्वयंसेवकांना काय मार्गदर्शन करणार आहे, याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान गायक शंकर महादेवन प्रमुख अतिथी असून ते शभक्ती गीत किंवा संघाचे गीत सादर करणार का याबाबत स्वयंसेवकांसह अनेकांना उत्सुकता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात शस्त्रपूजनाचे विशेष महत्त्व असते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी रेशीमबाग मैदानावर या उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी मोठे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. शिवाय स्वयंसेवकांसह संघाकडून निमंत्रित केलेले पाहुणे आणि नागरिकांसाठी वेगळी व्यवस्था राहणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस उद्याच्या कार्यक्रमात गणवेशात सहभागी होणार आहे. सकाळी ७.४० प्रमुख कार्यक्रम सुरू होणार असली तरी त्यापूर्वी स्वयंसेवकांचे पथसंचलन होणार आहे. मुख्य कार्यक्रमात उपस्थित अतिथींसमोर विविध कवायतींचे प्रात्यक्षिक करण्यात येईल. या उत्सवात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यावेळी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतील. सर्वसाधारणत: सरसंघचालकांच्या भाषणातून संघाच्या भविष्यातील योजना व भूमिकांचे संकेत मिळत असतात. त्यामुळे यंदाच्या उत्सवाला विशेष महत्त्व आले आहे.

हेही वाचा : गोंदिया शहरातील मुख्य बाजारात भांडे गोदामाला आग; गोदामातील साहित्य जळून राख

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका, देशातील वर्तमान सामाजिक व आर्थिक स्थिती, महागाईचा पडणारा भार, खलिस्तान्यांकडून होणाऱ्या कुरापती, केंद्र शासनाची कामगिरी, सामाजिक समरसता, आरक्षणाचा मुद्दा, ग्रामविकास, दुर्गम क्षेत्रांचे मागासलेपण, संघ-शासन-समाजाचा समन्वय इत्यादींसंदर्भात डॉ. भागवत मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. यावेळी आगामी लोकसभा निवडणुका बघता केंद्र तसेच राज्यातील मंत्री देखील उपस्थित राहण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

हेही वाचा : धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी गोंदिया ते नागपूर अतिरिक्त बसगाड्या

स्वयंसेवकांमध्ये उत्साह

यंदा पुढील लोकसभा निवडणुकांच्या अगोदरचा अखेरचा विजयादशमी उत्सव असेल. संघाच्या शाखांची वाढलेली संख्या, वाढता दबदबा आणि संघाच्या कार्यक्रमांबाबत जनतेमध्ये निर्माण झालेले आकर्षण यामुळे यंदादेखील यासंदर्भात स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या सोहळ्याचे ‘वेबकास्टिंग’ करण्यात येणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur rashtriya swayamsevak sangh chief mohan bhagwat speech on dasara melava preparations for vijayadashami vmb 67 css