Premium

नर्मदा भ्रमण करण्यास निघालेल्या साधुंना सत्काराचा गहिवर

अमरकंटक ते अमरकंटक असा दीर्घ प्रवास करीत फिरणारे साधू वर्धा वास्तव्यास आले असताना त्यांना सुखद प्रत्यय आला.

wardha appreciation sadhus visit narmada
नर्मदा भ्रमण करण्यास निघालेल्या साधुंना सत्काराचा गहिवर (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्धा: तिर्थाटनास निघालेल्या साधूंची देशभर भ्रमंती होत असल्याची भारतीय संस्कृती अद्याप जिवंत असल्याचे पाहायला मिळणे दुर्मिळच. अमरकंटक ते अमरकंटक असा दीर्घ प्रवास करीत फिरणारे साधू वर्धा वास्तव्यास आले असताना त्यांना सुखद प्रत्यय आला.

त्यांना प्राप्त माहिती आधारे ते येथील तुळजाभवानी मंदिरात पोहचले. या ठिकाणी विश्वस्त पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी या सात साधूंचे स्वागत करीत त्यांना घरी नेले. अग्निहोत्री परिवाराने साधूंचा यथोचित सन्मान केला. वस्त्र, अन्न व राशीदान करण्यात आले.

हेही वाचा… चंद्रपुरात पाऊस; हनुमान मंदिरावर वीज कोसळली; नवरदेव थोडक्यात बचावला

पं. अग्निहोत्री म्हणाले की, तीर्थाटन करण्याची भारतीय परंपरा आदरातिथ्य करण्याची संधी देत असते. समाजाची दानवृत्ती त्यामुळे कायम राहते. सत्कारप्राप्त नर्मदा शास्त्री यांनी, या परिक्रमेत नर्मदा नदीच्या पाण्याने आंघोळ करण्याचे व त्या माध्यमातून नर्मदेकडे देशाचे हित साधण्याची कामना केली जाते. आजवरच्या प्रवासात या ठिकाणी झालेला सन्मान कायमचा स्मरणात राहील, असे सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In wardha appreciation to the sadhus who set out to visit the narmada pmd 64 dvr

First published on: 30-05-2023 at 11:47 IST
Next Story
नागपूर : एमडी तस्करीची भीती दाखवून डॉक्टरची ३ लाखांनी फसवणूक; गुन्हा दाखल