नागपूर : भौगोलिकदृष्ट्या भारताच्या केंद्रस्थानी असलेले ग्रेड -१ हेरिटेज झिरो माईल स्टोनचा पर्यटनाच्या दृष्टीने महापालिका सौंदर्यीकरण आणि विकास करणार, असा महत्वपूर्ण निर्णय हेरिटेज संवर्धन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. हेरिटेज संवर्धन समितीचे अध्यक्ष अनुप कुमार यांच्या अध्यक्षतेत बुधवारी महापालिकेत बैठक घेण्यात आली. बैठकीत महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, समितीच्या सदस्य सचिव लीना उपाध्ये आणि तज्ञ सदस्य उपस्थित होते.  मुख्यमंत्री यांचे सल्लागार आनंद बंग आभासी पद्धतीने बैठकीमध्ये सहभागी झाले. या प्रकल्पासाठी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन सीएसआर निधीतून अर्थसहाय्य करणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महापालिकेतर्फे वास्तू शिल्पकार परमजीत सिंग आहुजा यांनी झिरो माईलच्या विकासा संदर्भातील प्राथमिक स्वरूपाचा आराखडा तयार केला असून त्यांनी या प्रारूपाची मांडणी सभेत केली. त्यांनी सांगितले की, झिरो माईल लगतच्या जागेवर भूमिगत ‘ग्रेट ट्रिग्नॉमेट्रीकल’ सर्वे चे संग्रहालय स्थापित केले जाईल. तसेच महापालिकेच्या जागेवर पार्किग आणि पर्यटकांसाठी इतर व्यवस्था केली जाईल. येथे भेट देणाऱ्या नागरिकांसाठी ॲम्पिथिएटर तसेच फूड कोर्टचा सुद्धा प्रस्ताव त्यांनी दिला त्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात येथे येतील, हेरिटेज संवर्धन समितीचे कार्यालय सुद्धा तिथे राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीतील चर्चेनुसार या प्रकल्पाला इंडियन ऑइल कॉर्पोरेशन सीएसआर निधीतून विकास कामात सहकार्य करणार आहे. नागपूरसाठी हा पर्यटनाच्यादृष्टीने महत्वाचा प्रकल्प असून, महापालिकातर्फे सदर झिरो माईल पर्यटनक्षेत्राचा विकास होईल असे महापालिका आयुक्तांनी आश्वस्त केले. सध्या झिरो माईलच्या संवर्धनाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करीत आहे. सभेत संवर्धन समितीच्या सदस्यांनी सुद्धा आपले मत मांडले. त्यांच्या सल्लानुसार झिरो माईलच्या विकास आरखड्यात बदल करून मुख्यमंत्री यांचे समोर सादरीकरण करण्यात येईल, असे महापालिका आयुक्तांनी सांगीतले.

नागपूर शहर

महाराष्ट्राची उपराजधानीचे शहर असलेल्या नागपूर शहराचा अतिशय प्राचीन असा इतिहास आहे. नागपुरात गोंड राजापासून ते भोसले राजांनी राज्य केलं. देशाचं झिरो माईल , संत्रानगरी , मिडल ऑफ कंट्री अशा वेगवेगळ्या नावानी या शहराची ओळख आहे. 

नागपूर हे अतिप्राचीन शहर आहे. या शहरांचे उल्लेख १० व्या शतकात मिळालेल्या ताम्रपटात आढळून आला आहे. या शहराची निर्मिती छिंदवाडा जिल्ह्यातील देवगडच्या गोंड राज्याने १७०२ साली नाग नदीच्या तीरावर नागपूर शहराची स्थापना केली. नाग नदीच्या तीरावर असल्याने शहराला नागपूर हे नाव देण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian oil to beautify zero mile in nagpur rbt 74 amy