वर्धा : आता घरोघरी गणपती बसविण्याचा कल मुलांच्या आग्रहापोटी पाळल्या जात असल्याचे दिसून येते. पिओपीच्या मुर्त्यांना मनाई आहे.तर विकतच्या मुर्त्यां महागड्या.म्हणून यात एक पर्याय येथील महिलांनी दिला आहे.गुंज या पर्यावरणप्रेमी संस्थेच्या हर्षा परमानंद टावरी यांनी सांगितले की स्वहस्ते तयार केलेली मूर्ती घरी बसविण्याचा आनंद काही औरच असतो.म्हणून १३ सप्टेंबरला कार्यशाळा ठेवण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लहानुजी महाराज देवस्थानात होणाऱ्या या कार्यशाळेत अर्चना राठी,सरिता भुतडा,गुंजन तापडिया या मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देतील. माती इथेच मोफत मिळणार असून कोणीही यात भाग घेवू शकतो.फक्त नोंदणी आवश्यक आहे. मूर्तीचा आकार किती असावा, बैठी की उभी, सजावट या अनुषंगाने माहिती देत मूर्ती घडवून घेतल्या जाणार आहे. ही एक कलाच असून त्याचा प्रसार व पर्यावरण प्रेमाचा आविष्कार करण्याचा हेतू असल्याचे सांगण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Install self made ganesha idol with free soil environment women initiative pmd 64 amy