लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर: भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी उपपंतप्रधान, माजी केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारत रत्न ‘ जाहीर झाल्याने नागपूरच्या संघ वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे. अडवाणी यांनी नागपूरच्या संघ मुख्यालयात येऊन अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर सरसंघचालकांशी चर्चा केली. यापैकीच एक अडवाणीच्या नागपूर भेटीची आठवण महत्वाची आहे.

२०१४ पासून दिल्लीत मोदी राजवट सुरू झाली. मात्र त्यापूर्वी अडवाणी यांचा शब्द भाजपमध्ये अंतिम मानला जात होता. अयोध्येतील राममंदिर उभारणीसाठी काढलेल्या रथयात्रेमुळे भाजप संसदेत दोन वरुन ८० वर गेली होती. त्याच धर्तीवर अडवाणी यांनी २०११ मध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध यात्रेचे नियोजन केले होते. २०१४ मध्ये सार्वजनिक निवडणुका होत्या व त्या आपल्याच नेतृत्वात लढल्या जाव्या यासाठी अडवाणी प्रयत्न करीत असल्याची चर्चा त्यावेळी होती. मात्र संघ नवीन नेतृत्व उभे करण्याच्या मताचा होता व त्यामुळे संघाचा अडवाणी यांच्या प्रस्तावित यात्रेला विरोध असल्याची चर्चा होती.

आणखी वाचा-नवनियुक्त पोलीस आयुक्त रुजू होताच दुहेरी खुनाने उपराजधानी हादरली, चार आरोपींना अटक

याच पार्श्वभूमीवर ११ सप्टेंबर २०११ ला अडवाणी नागपूरला आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेऊन यात्रेला संघाने पाठिंबा द्यावा अशी विनंती त्यांनी केली होती. अडवाणी यांनी २०१४ च्या निवडणुकीत ते पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही असे संघाकडे स्पष्ट केले होते. नंतरच्या काळात भाजपने मोदी याना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केले. २०१४ च्या निवडणुकीत भाजपने मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. मोदींनीच अडवाणी यांना भारतरत्न घोषित केले

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lal krishna advani relation with rss headquarters here is some memories cwb 76 mrj
First published on: 03-02-2024 at 15:00 IST