ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील वायगाव येथे बिबट्याने एका महिलेवर हल्ला करून चक्क घरात ठिय्या मांडला. दरम्यान, बिबट्याला सात तासाच्या अथक परिश्रमानंतर बेशुध्दीकरणाचे इंजेक्शन देवून जेरबंद करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा बफर क्षेत्रातील गावात तसेच वनालगतचा गावामध्ये वन्यप्राणी-मानव संघर्ष तीव्र झाला आहे. वन्यप्राणी घरामध्ये शिरकाव करू लागले आहे. चंद्रपूर बफर वनपरिक्षेत्रातील मामला उपक्षेत्रात येणाऱ्या वायगांवात एका महिलेवर हल्ला करून बिबट्याने चक्क घरात ठिय्या मांडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नागपूर : “शिंदे-फडणवीस धनाजी-संताजीची जोडी, उध्दव ठाकरेंनी..,” चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल!

या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल होवून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी हालचाली करण्यात आल्या. मात्र, बिबट जेरबंद झाला नाही. वनविभागाचे शीघ्र कृती दलाचे पथक व शूटर व डॉक्टरांनी बिबट्याला बेशुध्दीकरणाचे इंजेक्शन देवून जेरबंद केले. तब्बल सात तास रेस्क्यू ऑपरेशन राबविल्यानंतर बिबटला जेरबंद करण्यात यश आले. या घटनेनंतर गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या परिसरात नागरिकांना दररोज वन्यप्राण्यांचे दर्शन होत असल्याने भीतीचे वातवरण निर्माण झाले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard attacked woman after seven hours of rescue operation leopard captured successfully rsj 74 zws