नागपूर : साहित्यिक, व्यंगचित्रकार, कवी आणि कुशल रंगमंच संचालक मधुप पांडे यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांचे निधन झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मधुप पांडे यांना साहित्य श्री हसीरत्न (काका हाथरासी पुरस्कार ट्रस्ट), विंध्य विभूती पुरस्कार, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, हिंदीसेवी सन्मान, विदर्भ हिंदी साहित्य संमेलन सर्वोच्च पुरस्कार, साहित्यिक सन्मानासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

हेही वाचा – अकोला महापालिकेकडून राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांची दिशाभूल? ‘स्वाती’ प्रकरणातील अनियमिततेचे प्रश्न अनुत्तरीत

हेही वाचा – पीएचडीबाबतच्या वक्तव्यावरून पेटलेल्या दिव्यावर अजितदादांची दिलगिरीची फुंकर! म्हणाले, “नेत्यांवर पीएचडी करणे…”

पहिल्या जागतिक हिंदी संमेलनाचे सहसंयोजक; मॉरिशसच्या चौथ्या जागतिक हिंदी परिषदेत भारत सरकारच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचे ते सन्माननीय सदस्यही होते. खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे ते पदाधिकारी होते. त्यांच्या अकाली निधनाने साहित्य क्षेत्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Literary cartoonist madhup pandey passed away vmb 67 ssb