नागपूर: स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्वबळावर लढायच्या हे भाजपचे पूर्वीच ठरले होते. पण मित्र पक्षाच्या भीती पोटी नेते बोलत नव्हते. आजपासून नगर पालिका आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरणे सुरू होणार आहे. बरोबर त्याच दिवशी पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या मनातील गोष्ट सार्वजनिक केली.

अनेक कार्यकर्ते स्वबळावर लढण्याची मागणी करत आहेत, कारण सात- आठ वर्षानंतर निवडणुका जाहीर झाल्यात पण आम्ही त्यांना सांगितले आहे की, महायुती महत्त्वाची आहे, असे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. ते नागपुरात वृत्त वाहिन्यांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

बावनकुळे म्हणाले, ज्या ठिकाणी महायुती होऊ शकत नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढताना त्या ठिकाणी मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी कार्यकर्त्यांनी घ्यावी. आज रामटेक मधील पदाधिकारी आले आहेत ते म्हणतात की, स्वतंत्र लढू द्या, मी त्यांना काही सूचना दिल्या आहेत, नक्की या ठिकाणी महाराष्ट्रात महायुती मध्ये प्रचंड उत्साह कार्यकर्त्यात आहे. महाराष्ट्रामध्ये आमची महायुती ५१ टक्के मतं घेऊन जिंकेल असा मला विश्वास आहे.. आम्ही सर्वाधिकार स्थानिक लेवलला दिला आहे, स्थानिक पातळीवर आमचं जिल्हा अध्यक्षांनी आणि कोर समितीने निर्णय करायचा आहे. जिल्हाध्यक्ष आणि कोर कमिटी ठरवेल त्यानुसारच पुढे जायचं आहे, असे बावनकुळे म्हणाले.

जिल्हाध्यक्षांना सूचना दिल्या, महायुतीचे चाचपणी करायची आणि मग पुढे जायचे या निवडणुकीत जिल्हास्तरीय प्रश्न आहेत, राज्याचा प्रश्न नाही आणि १३ हजाराच्या वर पदाची निवडणूक आहे, म्हणून त्या त्या लेव्हलला काय काय शक्यता आहे त्याची चाचपणी होते आहे.. मला वाटतं बऱ्यापैकी माहिती होईलच कारण शेवटी माहिती कुठे झाली आहे हे कळेल १७ तारखेला अंदाज बांधणं कठीण आहे कुठे होतंय कुठे होत नाही १८ तारखेपर्यंत वाटाघाटी चालणार आहेत शेवटच्या दिवसापर्यंत वाटाघाटी चालणार आहे