वर्धा : महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सदस्य मिळण्यापासून कुस्ती व अन्य खेळ प्रकारांना वंचित ठेवण्यात आले होते. अखेर त्यासाठी मोठे आंदोलन झाले. शेवटी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ व कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष व माजी खासदार रामदास तडस यांची शिष्टाई यशस्वी ठरली.महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ व इतर आठ क्रीडा संघटनांना महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता व मतदानाचे अधिकार देण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ सहीत विविध क्रीडा संघटनांना महाराष्ट्र ऑलिम्पक असोसिएशची मान्यता व पंचवार्षिक निवडणुकीपासून मतदानाचा अधिकार बजावण्यापासून दूर ठेवण्यात आले होते. तसेच महाराष्ट्र ऑलिम्पक असोसिएशन (एमओए) चे महासचिव नामदेव शिरगावकर यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात तडस यांच्या नेतृत्वात पुणे येथे आंदोलन व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदिप भोंडवे व विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू यांनी एमओएच्या कार्यालयाबाहेर उपोषन सुरु केले होते. या आंदोलनाला यश आले असुन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ व इतर ८ क्रीडा संघटनांना महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता व मतदानाचा अधिकार देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष, माजी खासदार रामदास तडस यांनी दिली.
पुणे येथे सर्व क्रीडा संघटनांना महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता व निवडणुकीत मतदानाचा अधिकार तसेच देण्यात यावा. महाराष्ट्र ऑलिम्पक असोसिएशन (एमओए) चे महासचिव नामदेव शिरगावकर यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात यांच्या विरोधात दिनांक २३ सप्टेंबर पासुन महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदिप भोंडवे व विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूचे आंदोलन व उपोषन सुरु होते, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये २२ खेळांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ व इतर आठ क्रीडा संघटनांना निवडणुकीत सहभागी करून घेतले असल्यामुळे तसेच महाराष्ट्र ऑलिम्पक असोसिएशन (एमओए) चे महासचिव नामदेव शिरगावकर यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आश्वासन क्रीडा आयुक्त व पोलिस प्रशासनाने दिल्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री श्री. मुरलीधर मोहोळ व क्रीडा अधिका-यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदिप भोंडवे यांचे उपोषण सोडण्यात आले. यावेळी सरचिटणीस योगेश दोडके, आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच विलास कथुरे, कराटे दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष सल्लाउद्दीन अन्सारी, सचिव संदिप गाडे, क्रीडा समन्वय समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष लतेंद्र भिंगारे, राष्ट्रीय तालीम कुस्ती संघाचे अध्यक्ष तात्यासाहेब भिंताडे, मिलिंद पठारे यांसह तायकांदो, कराटे, कुस्ती आदि खेळातील पदाधिकारी, आणि खेळाडू उपस्थित होते.
या सदंर्भात महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनची कार्यकारिणीची बैठक असुन बैठकीमध्ये २२ खेळांच्या व्यतिरिक्त अजून नऊ खेळांना निवडणुकीमध्ये मतदानाचे अधिकार देण्यात आले. त्यामध्ये पूर्वी वगळण्यात आलेल्या पाच खेळांच्या संघटनांचा पुन्हा समावेश करण्यात आला आहे.
राज्यात खेळाडू खेळामध्ये प्रगती करीत आहेत. प्रत्येक खेळाला न्यायही मिळणे गरजेचे आहे. महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या २ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत फक्त २२ खेळ संघटनांना मतदानाचे अधिकार दिले होते. सर्वच खेळांच्या संघटनांना मतदानाचा अधिकार मिळावा ही प्रमुख मागणी होती. कुस्ती खेळात संघटनांचा वाद असला तरी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाला राष्ट्रीय संघटनेची मान्यता आहे. संघाच्या वतीने एमओएच्या मान्यतेसाठी अर्ज दाखल करुनही अद्याप मान्यता दिलेली नव्हती. त्यामुळे आंदोलन व उपोषन करण्यात आले होते. परंतु आंदोलन व उपोषनाला यश आले असुन महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये ३१ खेळांना मतदानाचे अधिकार प्राप्त झाले आहे. २२ खेळांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ व इतर ८ खेळांना निवडणुकीत सहभागी करून घेतले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील खेळाडुंना न्याय मिळेल व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे नाव करेल असा विश्वास महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष, माजी खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केला.