गडचिरोलीतील कार्यासाठी गौरव

नागपूर : गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट सेवेसाठी आयपीएस अधिकारी व मुंबईचे पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे, अमरावतीचे पोलीस अधीक्षक हरी बालाजी आणि नागपुरातून सेवानिवृत्त झालेले पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार परमानंद तिवारी यांना शौर्य पदक जाहीर झाले आहे.

पोलीस दलात कार्यरत असतांना नेमणुकीच्या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना स्वातंत्र दिनानिमित्त शासनाकडून सन्मानित केले जाते. यावर्षी सुध्दा गडचिरोली पोलीस दलात कार्यरत असताना उत्कृष्ट सेवा बजावलेले २१ पोलीस अधिकारी व सध्या कार्यरत असलेल्या शिपायांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक जाहीर झाले.  एका अधिकाऱ्याला गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक जाहीर झाले आहे.

राष्ट्रपती पोलीस शौर्य पदकप्राप्त पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांमध्ये मुंबईचे पोलीस उपायुक्त  मंजुनाथ हुचप्पा सिंगे, अमरावती ग्रामीणचे अधीक्षक हरी बालाजी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नवनाथ ठकाजी ढवळे, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार परमानंद तिवारी, सहायक पोलीस निरीक्षक योगेश देवराव पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन सुरेश काटकर, हवालदार लिंगनाथ ननैय्या पोरतेट, रोहिदास सिलुजी निकुरे, अरविंद कुमार पूरनशाह मडावी, मोरेश्वर पत्रू वेलादी, प्रवीण प्रकाशराव कुलसाम, सडवली शंकर आसाम, आशिष देविलाल चव्हाण, शिपाई बिच्चु पोचय्या सिडाम, शामसाय ताराचंद कोडापे, नितेश गंगाराम वेलादी, पंकज सिताराम हलामी, आदित्य रवींद्र मडावी, रामभाऊ मनुजी हिचामी, मंगलशाह जीवन मडावी, ज्ञानेश्वर देवराम गावडे, शिवा पुंडलिक गोरले यांचा समावेश आहे.  सहायक पोलीस निरीक्षक मोतीराम बक्काजी मडावी यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी  पोलीस पदक मिळाले आहे.  या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा सामना करताना उल्लेखनिय कार्य केले आहे.