अकोला: हरियाणातील गुडगाव येथे नोकरीवर असलेल्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेम जडले. त्यामुळे घटस्फोटासाठी मानसिक व शारीरिक छळ करीत असल्याची तक्रार ३३ वर्षीय विवाहितेने अकोट शहर पोलीस ठाण्यात केली. या प्रकरणी पती, सासू व सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अकोट येथील विवाहितेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, २०१५ मध्ये तिचे लग्न मुंबईतील एका युवकासोबत झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विवाहितेला दोन अपत्ये आहेत. नोकरीच्या निमित्ताने पती हरियाणातील गुडगाव येथे आहे. घरात क्षुल्लक कारणावरून सासू-सासरे वाद घालतात. टोमणे मारून छळ करतात. सहा महिन्यांपूर्वी विवाहितेला तिच्या पतीचे कार्यालयामधील एका महिलेसोबत प्रेम प्रकरण सुरू असल्याचे कळले. त्यानंतर पतीने घटस्फोट देण्यासाठी पत्नीच्या मागे तगादा लावला.

हेही वाचा… स्पा आणि मसाजच्या नावावर सेक्स रॅकेट; कोलकाता, मुंबई- दिल्लीतील ६ मुलींची सुटका

दुसरे लग्न करायचे असल्याचे सांगून घटस्फोटासाठी पतीने जोर जबरदस्ती केल्याचे पत्नीने तक्रारीत नमूद केले आहे. ३१ मार्च २०२३ रोजी पतीने मुंबईवरून अकोट येथे जाण्यासाठी तिकीट काढून बळजबरीने घरातून हाकलून दिल्याचा आरोपही विवाहितेने केला. या प्रकरणी भरोसा सेलमध्ये पती-पत्नीमध्ये तडजोड करण्याचा प्रयत्न झाला. त्याला यश न आल्याने विवाहितेच्या तक्रारीनुसार पती व सासू-सासऱ्याविरुद्ध अकोट शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mental and physical harassment of wife for divorce due to husbands affair with another woman in akola ppd 88 dvr