राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणूक प्रचारात ‘जुनी पेन्शन योजना आमचेच सरकार देऊ शकते’, असे मतदारांना सांगितले होते. आता निवडणूक आटोपली आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपाचेच सरकार आहे. त्यामुळे जुनी पेन्शन योजना लागू करा, असे आवाहन आमदार सुधाकर अडबाले यांनी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- भंडारा: शंकरपटात बैलजोडी झाली सैराट, अन्…; जगत गुरुजींच्या बैलजोडीचा व्हिडिओ व्हायरल

महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटना, नागपूर विभागतर्फे शनिवारी नवनिर्वाचित आमदार सुधाकर अडबाले यांचा सत्कार करण्यात आला होता. यावेळी अडबाले बोलत होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे सरचिटणीस विनोदजी दुर्गपुरोहित, सहसरचिटणीस शिवाजी ढुमणे, विभागीय अध्यक्ष अविनाश गभणे, सचिव डी.वाय. पाटील व निदेशक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा- वर्धा: हिंदी विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या आंदाेलनाने तणावपूर्ण वातावरण, पोलीस बंदोबस्तात वाढ; जाणून घ्या कारण…

अडबाले म्हणाले, विधान परिषद निवडणूक लागताच सर्व प्रथम महाराष्ट्र राज्य आयटीआय निर्देशक संघटनेने मला पाठिंबा दिला. त्याबद्दल सर्वांचे आभार. जुनी पेन्शन नाकारणाऱ्या भाजपाचा निवडणुकीत दारुण पराभव झाला. आता तरी सरकारने या मुद्यावर सकारात्मक विचार करावा. २००५ नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी, ही समस्त शिक्षक, राज्य कर्मचारी व आता जनसामान्यांची सुद्धा मागणी आहे. या मागणीसाठी आजवर रस्त्यावरची लढाई सुरू होती. आता सभागृहात लढा देऊ तसेच आयटीआय निर्देशकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न करू. संचालन मेहेरे यांनी तर आभार प्रेमानंद भैसारे यांनी मानले. यावेळी निदेशक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla sudhakar adbales appeal to the state government to implement the old pension immediately cwb 76 dpj