लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुलढाणा: एरवी संकटातही धीरगंभीर व संयमी राहणारे शिंदे गटाचे जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी ‘बाप तो बाप होता है’ या गाण्यावर सुहास्य मुद्रेने ठेका धरला अन दंडही थोपटले. अर्थात ठेका कार्यकर्त्यांच्या प्रेमळ आग्रहामुळे आणि दंड थोपटले त्यांना मेहकर मतदारसंघात घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना दाखविण्यासाठी.

मेहकर मतदारसंघासह सहकार क्षेत्रातही खासदार जाधव यांचे मागील साडेतीन दशकापासून वर्चस्व राहिले आहे. मेहकर, लोणार बाजार समित्याच्या निवडणुकीत जाधव यांना मात देण्यासाठी महाविकास आघाडीने जंग जंग पछाडले, पण जमले नाही. त्यापाठोपाठ मेहकर खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत आघाडीने तिसऱ्यांदा हा प्रयत्न करून पाहिला.

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/05/dance-vid.mp4
व्हिडीओ – लोकसत्ता टीम

हेही वाचा… बुलढाणा : मलकापूर अर्बनची चौकशी करा, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटेंची मागणी

मात्र, १७ पैकी १७ जागा जिंकून खासदारांच्या नेतृत्वाखालील भूमिपुत्र पॅनेलने एकतर्फी विजय मिळवीत आघाडीला धूळ चारली. काल मध्यरात्री लागलेल्या निकालानंतर शिंदे सेनाने विजयाचा जल्लोष साजरा केला. यावेळी आपले मोठेपण विसरून खासदारांनी विरोधकांना संदेश देणाऱ्या सूचक गाण्यावर ठेका धरला. यात आमदार संजय रायमूलकर, तालुका प्रमूख सुरेश वाळूकर, शहर प्रमुख जयचंद बाठिया सुद्धा सहभागी झाले.

हेहा वाचा… भाजपा उमेदवार मणिकांत राठोड यांनी रचला हत्येचा कट! काँग्रेसचा गंभीर आरोप, नागपूर पोलिसात तक्रार

भूमिपुत्र पॅनेलचे सुरेश वाळूकर, राजेंद्र वानखेडे, जीवन वानखेडे, कमल वानखेडे, कमल धोंडगे, कैलास बाजड, प्रशांत काळे, स्वप्नील घोडे, मदन अण्णा चनखोरे, रवि चुकेवार, दत्तात्रय टेकाळे,विजय देशमुख, विनोद देशमुख, शत्रूघन निकस, दीपक मगर, आत्माराम शेळके, मनोज सावजी हे उमेदवार विजयी झाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp prataprao jadhav performed on the song bap to bap hota hai scm 61 dvr