नागपूर: पूजा खेडकरच्या प्रकरणानंतर डाॅ. ओम्बासे यांचे प्रकरण राज्यात चर्चेत आले आहे. सोलापूर महापालिकेचे आयुक्त डाॅ. सचिन ओम्बासे यांनी बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे आरक्षणाचा लाभ घेऊन केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत नोकरी (आयएएस) मिळवल्याच्या तक्रारीची दखल घेत केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या (डीओपीटी) सचिवांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून डॉ. ओम्बासे यांच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करून तसा अहवाल सादर करण्याची सूचना केली होती.
मागील काही वर्षातील मोठ्या पदावरील अधिकाऱ्यांच्या कागदपत्राचा गोंधळ लक्षात घेता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. यामुळे एमपीएससीची तयारी करणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण असून त्यांनी परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी अर्ज प्रक्रियेत काय बदल करण्यात आले हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदभरतीकरीता प्रसिध्द जाहिरातीस अनुसरुन अजांद्वारे केलेल्या विविध दाव्यास अनुसरुन उमेदवारांनी अपलोड करावयाच्या प्रमाणपत्र / कागदपत्र / पुराव्याबाबतचा तपशील आयोगाच्या संदर्भिय दिनांक १७ ऑगस्ट २०२१ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकान्यचे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. विविध दाव्याच्या अनुषंगाने संबंधित जाहिरातीस अनुसरुन ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे उमेदवाराची पात्रता माहिती झाल्यानंतर उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास खालील प्रमाणपत्र / कागदपत्र / पुरावा अपलोड करणे अनिवार्य ठरविण्यात आले आहे.
एमपीएससीने याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले. त्यानुसार उमेदवारांना अर्ज भरताना सादर कराव्या लागणाऱ्या कागदपत्रांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत एकूण २० प्रकारच्या कागदपत्रांचा समावेश आहे. संबंधित कागदपत्रे उमेदवारांना जाहिरातीस अनुसरून निश्चित केलेले निकष, पात्रता, तसेच खात्यातील दाव्यांच्या अनुषंगाने कागदपत्रे, प्रमाणपत्रे अपलोड करावी लागतील. एखाद्या उमेदवाराने निश्चित केलेल्या कार्यपद्धतीनुसार वैध प्रमाणपत्र, पुरावा अपलोड न केल्यास संबंधित उमेदवाराला खात्याद्वारे वैध प्रमाणपत्र, पुरावा सादर करण्यास सात दिवसांची केवळ एक संधी देण्यात येईल. संबंधित उमेदवाराला लघुसंदेश, ई-मेलद्वारे, वैयक्तिकरीत्या, एमपीएससीच्या संकेतस्थळावर प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळवण्यात येईल.
सर्व उमेदवारांना अनिवार्य प्रमाणपत्र/कागदपत्र
(१) एस.एस.सी. अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता
(२) उमेदवाराने एस.एस.सी. अहंता धारण न करता दूरस्थ पध्दतीने पदची धारण केली असल्यास पदट्ठीचे प्रमाणपत्र अथवा पदवीचे अंतिम वर्षाचे गुणपत्रचा
(२) मॅट्रिकचे प्रमाणपत्र माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (२) विहित नमुन्यातील सक्षम प्राधिका-याने प्रदान केलेले वयाचे प्रमाणपत्र
(३) शासनाच्या स्थायी सेवेतील उमेदवारांच्या बाचतीत-उपरोल्लेखित प्रमाणपत्र किंवा त्यांच्या सेवाअभिलेख्याल नोंदविलेला त्यांचा जन्मदिनांक नमूद करणा-या सेवा अभिलेखयातील उता-याची प्रमाणित प्रत (अर्थात दावा केला असल्यास)
(४) जन्म दिनांक नमूद असलेला शाळा/महाविदयालय सोडल्याचा दाखला
(५) नगर पालिका / महानगरपालिका / ग्रामपंचागतीचा जन्म दाखला.
(६) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियंत्रणाखालील पदासाठी अर्ज करणारे महानगरपालिकेच्या स्थायी सेवेतोल उमेदवार किया बृहन्मुंबई विद्युत गुरवठा व परिवहन उपक्रमाच्या नियंत्रणाखालील पदासाठी अर्ज करणारे उपक्रमाच्या स्थायी सेवेतील उमेदवार यांना उपरोल्लेखित प्रमाणपत्र किंवा त्यांचा जन्मदिनांक नमूद करणाऱ्या त्यांच्या सेवा अभिलेखातील प्रमाणित उलान्याची प्रत (अर्जात दावा केला असल्यास)
(७) पदवीच्या अंतिम वर्षाचे गुणपत्रक तसेच व (२) पदवी प्रमाणपत्र अथवा तात्पुरते पदवी प्रमाणपत्र अथवा पदवीच्या सर्व सत्राचे गुणपत्रक (३) विशिष्ट शेक्षणिक अर्हतेसंदर्भात जाहिरातीनुसार आवश्यक शैक्षणिक अर्हतेबाबतची सर्व गुणपत्रके व प्रमाणपत्रे
सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्ग
(१) महाराष्ट्रातील राज्यातील सामाजिक आरक्षणाबाबत सामाजिकदृष्टया मागास प्रवर्गाकरोता सक्षम प्राधिका-याने प्रदान केलेला जातीचा दाखला
(२) अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती व्यतिरिक्त अन्य मागास प्रचगांतील उमेदवार क्रिमीलेयर मध्ये समाविष्ट होत असल्यास सतीचा दाखला सादर करण्याची आवश्यकता नाही.