महापौरांना सहा महिने मुदतवाढ मिळाल्यानंतरचा कार्यकाळ संपला आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लांबणीवर पडलेली नव्या महापौरांची निवड  डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात केली जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यामुळे विधानसभा निवडणुकीची धामधूम आटोपताच महापालिकेत आणि पक्षातंर्गत महापौरपदासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

महापालिकेत भाजपची सत्ता येताच अडीच वर्षांसाठी नंदा जिचकार यांची महापौरपदी निवड करण्यात आली. त्यांचा कार्यकाळ मार्चमध्ये संपला. परंतु महापौरांनी सुरू केलेले विविध विकास प्रकल्प आणि युवकांसाठी सुरू करण्यात आलेल्या उपक्रम पूर्ण करायचे असल्यामुळे त्यांना सहा महिने मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत  सप्टेंबरमध्येच संपली. मात्र, विधानसभा निवडणुकीमुळे त्यांना  पुन्हा मुदतवाढ मिळाली. मात्र, आता निवडणूक संपली असून राज्यात सरकार स्थिर झाल्यानंतर शहराचा महापौर बदलण्यास वेग येणार आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात सोडत निघणार असून त्यात नागपूर महापालिकेत महापौर पद आरक्षित खुले किंवा महिलांसाठी आरक्षित झाले तर काय, या दृष्टीने पक्षाकडून चाचपणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

किंबहुना भाजपमध्ये आतापासूनच नवा महापौर कोण, यावर चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीत शहरात भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही.  दोन जागा गमवाव्या लागल्या. त्यामुळे आलेले अपयश नेमके कशामुळे झाले यावर पक्षात चिंतन सुरू झाले आहे. यातच काहींनी महापौर बदलाचेही सूर छेडले आहेत. सर्वच वर्गातील इच्छुक नगरसेवकांनी आतापासून महापौरपदासाठी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur city will get new mayor soon abn