नागपूर : नागपूरचे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी तरूणांच्या मतदार नोंदणीसाठी राबवलेल्या ‘ मिशन युवा ‘ उपक्रमाची केंद्रीय निवडणूक आयोगाने दखल घेतली असून त्यांना ‘बेस्ट इलेक्ट्रॉल प्रॅक्टिस अवार्ड ‘२०२३ ‘ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार प्राप्त करणारे डॉ विपीन इटनकर हे महाराष्ट्रातील एकमेव अधिकारी आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे निवडणूक सुधारणा, मतदार शिक्षण, निवडणूक व्यवस्थापन, सुरक्षा नियोजन या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी अधिका-यांना पुरस्कार (बेस्ट इलेक्ट्रॉल प्रॅक्टिस अवार्ड) दिले जातात. २०२३ या वर्षांसाठी निवडणूक आयोगाने पुसकाराची यादी जाहीर केली. त्यात देशभ-यातील ७ आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर हे त्यापैकी एक आहे.

हेही वाचा…देशाला कृषिमंत्री द्या! यवतमाळच्या शेतकऱ्याचे पंतप्रधानांना साकडे

मतदार शिक्षण आणि सहभाग या गटात त्यांना पुरस्कार जाहीर झाला निवडणुकांमध्ये मतदार संख्या वाढविण्यासाठी डॉ. विपिन इटनकर यांनी ‘मिशन युवा ‘ अभियान राबविले होते. या अभियाना अंतर्गत त्यांनी १५ जुलै २०२३ ते जानेवारी २०२४ या दरम्यान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ हजार युवा मतदाराची नोंदणी करण्यासाठी अभियान जिल्ह्यामध्ये सुरु केले. यात जानेवारी २०२४ अखेर १७ ते १९ वयोगटातील ८८६०९ नव युवा मतदारांची नोंदणी करण्यात आली असून अद्याप ही मतदार नोंदणी सुरू आहे. या अभियानाची नोंद भारत निवडणूक आयोगाने घेतली आहे. स्वतः उद्दिष्ट ठरवून ते पूर्ण केल्याचे विशेष कौतूक आयोगाने केले आहे.निवडणूक खर्चाच्या संदर्भातील उत्कृष्ट कामाच्या संदर्भात कर्नाटकच्या श्रीमती सीखा या आयएएस अधिकाऱ्यांना पुरस्कार मिळाला आहे. तर उत्कृष्ट कार्य करणारे निवडणूक राज्य म्हणून छत्तीसगड राज्याचा सन्मान करण्यात आला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur district collector won national award for mission yuva voter registration campaign cwb 76 psg