अकोला : अकोला जिल्हा परिषदेच्या २८४ पदांसाठी होत असलेल्या पदभरतीसाठी तब्बल १.४६ कोटी रुपये परीक्षा शुल्क जमा झाले आहे. या पदभरतीसाठी १६ हजारांवर उमेदवार स्पर्धेत उतरले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील जागांसाठी राज्य भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यात अकोला जिल्हा परिषदेच्या २८४ जागांसाठी १६ हजार ७१ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले. परीक्षा शुल्कापोटी १ कोटी ४६ लाख सात हजार ६०० रुपये जमा करण्यात आले. या जागांसाठी पुढील महिन्यात परीक्षा घेण्यात येणार आहे. ३, ४ व ५ ऑक्टोबर रोजी परीक्षा होईल. संवर्गनिहाय तीन टप्प्यांत ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या प्रक्रियेत परीक्षा शुल्कापोटी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी प्रत्येकी एक हजार रुपये आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी प्रत्येकी ९०० रुपये शुल्क आकारले.

हेही वाचा – लंडन येथून वाघनखे आणण्यात नक्कीच यश, मुख्यमंत्री शिंदेंकडून मुनगंटीवार यांचे कौतुक

हेही वाचा – कौतुकास्पद! जिल्हा परिषद शाळेची श्वेता उमरे महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण

दोन विस्तार अधिकारी पदांसाठी २७५८ जण रांगेत

जिल्हा परिषदेच्या पदभरतीमध्ये दोन विस्तार अधिकारी पदासाठी २७५८ अर्ज आले आहेत. याशिवाय आरोग्य सेवक पुरुष ५१ जागांसाठी ३०५२ अर्ज, आरोग्य सेवक महिला १२२ जागांसाठी ८८३, औषध निर्माण अधिकारी १५ जागांसाठी १८५७, कंत्राटीची ग्रामसेवक २९ जागांसाठी २९३३, कनिष्ठ अभियंता स्थापत्य २४ जागांसाठी ८६८, कनिष्ठ लेखाधिकारी दोन जागांसाठी १२४, कनिष्ठ सहाय्यक लेखा तीन जागांसाठी २३७, पशुधन पर्यवेक्षक पाच जागांसाठी १०९, वरिष्ठ सहाय्यक लेखा दोन जागांसाठी ७४, विस्तार अधिकारी कृषी चार जागांसाठी ६२८, विस्तार अधिकारी शिक्षण एका जागेसाठी ३९, विस्तार अधिकारी सांख्यिकी पाच जागांसाठी १३७४, पर्यवेक्षिका तीन जागांसाठी १५८, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक १८ जागांसाठी ९०४ तर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी एका जागेसाठी ११३ अर्ज प्राप्त झाले आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nearly 1 and half crore exam fee collected for 284 posts of akola zp ppd 88 ssb