नागपूर: अन्यथा ओबीसी खात्याचे मंत्री सावे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही ; विद्यार्थ्यांचा इशारा | OBC Department Minister Save will not be allowed to roam the streets students warn amy 95 | Loksatta

नागपूर : अन्यथा ओबीसी खात्याचे मंत्री सावे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही ; विद्यार्थ्यांचा इशारा

पीएच.डी. शिष्यवृतीच्या विद्यार्थी संख्येत वाढ करणे, एम.फील. आणि पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना संलग्नित अधिछात्रवृत्ती द्यावी

नागपूर : अन्यथा ओबीसी खात्याचे मंत्री सावे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही ; विद्यार्थ्यांचा इशारा
महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण केंद्र म्हणजेच ‘महाज्योती’च्या विविध योजना सुरू असल्या तरी व्यवस्थापकीय संचालकांच्या दुर्लक्षामुळे अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा, आरोप करीत विद्यार्थ्यांनी महाज्योती कार्यालयासमोर आंदोलन केले

महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण केंद्र म्हणजेच ‘महाज्योती’च्या विविध योजना सुरू असल्या तरी व्यवस्थापकीय संचालकांच्या दुर्लक्षामुळे अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा, आरोप करीत विद्यार्थ्यांनी महाज्योती कार्यालयासमोर आंदोलन केले. बहूजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी नागपूर येथील महाज्योती कार्यालयाला भेट दिली असता विद्यार्थ्यांनी त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले व मागण्या मान्य न झाल्यास सावे यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा दिला.

हेही वाचा >>> नागपूर : ब्रम्हपुरीतील मुलीवर बलात्कार प्रकरणात आणखी ५ आरोपी , राजकीय नेत्यांचाही समावेश

पीएच.डी. शिष्यवृतीच्या विद्यार्थी संख्येत वाढ करणे, एम.फील. आणि पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना संलग्नित अधिछात्रवृत्ती द्यावी, बार्टी संस्थेप्रमाणे विद्यापीठाच्या नोंदणी दिनांकापासून एम.फील. आणि पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना पाच वर्षे अधिछात्रवृत्ती द्यावी अशा विविध मागण्यांसाठी महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले व अतुल सावे यांना निवेदन दिले. मागण्या मान्य न झाल्यास सावे यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
नागपूर : ब्रम्हपुरीतील मुलीवर बलात्कार प्रकरणात आणखी ५ आरोपी , राजकीय नेत्यांचाही समावेश

संबंधित बातम्या

नागपूर: भाजपच्या माजी आमदाराला मिळालेले पुरस्कार, सन्मान चिन्हे पदपथावर विक्रीला
नागपूर : रेल्वे प्रवाशांना सांताक्लॉज पावला; पुणे-मुंबईसाठी आता….
दुष्काळ निवारणास महाराष्ट्राला २५०० कोटी रुपयांचा निधी
पश्चिम घाटात जलचर सापाच्या नव्या प्रजातीचा शोध
राणा दाम्पत्याचे कुख्यात युसूफ लकडावालाशी आर्थिक संबंध? – संजय राऊतांचे आरोप पुन्हा चर्चेत!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
चीनमध्ये जनआंदोलनानंतर करोना निर्बंध शिथिल 
तृतीयपंथीयांना नोकरीची संधी डावलता येणार नाही; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
नेत्यांकडे स्वत:ची मते, व्यासंग असावा – देवेंद्र फडणवीस
गोवर रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी हाफकीन तयार
Maharashtra Karnataka border: एसटीच्या ३८२ फेऱ्या अंशत: रद्द