अकोला : ‘आश्चर्यचकीत होऊ नका! हा चांद्रयान ३ ने काढलेला चंद्राच्या पृष्ठभागाचा फोटो नाही तर अकोल्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा फोटो आहे.’, अशी खोचक टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. यासंदर्भात त्यांनी केलेले ट्विट चांगले चर्चेत आले आहे. अकोला शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मार्मिक शब्दांमध्ये सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मराठा आरक्षणाविरोधात १७ सप्टेंबरला संपूर्ण कुणबी समाज रस्त्यावर उतरणार

गेले काही वर्षांपासून स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका प्रलंबित आहेत. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी ते सोडवण्यासाठी सभागृहात लोकप्रतिनिधी नाहीत. भाजप-शिंदे सेनेचे सरकार प्रशासकाच्या माध्यमातून कारभार हाकत आहेत. जनतेचे अनेक प्रश्न रखडले आहेत. त्यातच अकोल्यातील रस्त्यांचीही चाळणी झाली. खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.  रस्त्यांच्या दयनीय अवस्थेवरून खड्ड्यांचे फोटो ट्विट करीत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी, ”आश्चर्यचकित होऊ नका. हा चांद्रयान ३ द्वारे काढलेला चंद्राच्या पृष्ठभागाचा फोटो नसून अकोल्यातील रस्त्यांचा फोटो आहे. आता अकोल्यात चंद्र आणण्यासाठी कोण जबाबदार आहे हे तुम्हीच ठरवायचं आहे!” असे खोचक भाष्य केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar compared potholes on nagpur road with photo of lunar surface taken by chandrayaan ppd 88 zws