डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असलेले प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राज्याच्या राजकारणात स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. भारिप बहुजन महासंघ यांचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले प्रकाश आंबडेकर यांनी लोकसभेचे दोन वेळा तर राज्यसभेचे एक वेळा प्रतिनिधित्व केले आहे.
राजकारणात विविध विषयांवर ठोस मते व्यक्त करत वैचारिक भूमिका मांडणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील एक प्रमुख राजकीय नेते म्हणून ठसा उमटवला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबडेकर यांनी विदर्भातील आदिवासी, ओबीसी, मुस्लीम समाजातील काही संघटनांच्या मदतीने विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात अधिकाधिक…