बुलढाणा : नेपाळ किंबहुना आशिया खंडातील राजकीय अस्थिरता आणि अमेरिकेचे भारत देशाविषयीची घातक धोरणे यामुळे बुलढाणा येथील सामाजिक कार्यकर्ते व व्यावसायिक जितेंद्र एन. जैन यांनी देशाच्या व पंतप्रधानांच्या सुरक्षेसंबंधी चिंता व्यक्त केली आहे. नुसतीच चिंताच व्यक्त न करता त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लेखी पत्र लिहिले आहे.
सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जैन यांनी दिलेल्या पत्रात नमूद आहे की, देशाच्या सुरक्षा परिस्थितीबाबतच्या गंभीर काळजीमुळे आपल्याला हे पत्र लिहीत आहे. मी आपल्या पक्षाचा समर्थक नसलो तरी आपण माझ्या देशाचे पंतप्रधान आहात. देशप्रेम म्हणून, आपली सुरक्षा हा केवळ आपला व्यक्तिगत विषय नसून देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. म्हणूनच, मी हे कर्तव्य समजून आपल्याला ही शंका आणि भीती व्यक्त करत आहे.
सध्या श्रीलंका, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार आणि आता नेपाळ या आपल्या शेजारील देशांमध्ये होत असलेल्या गृहयुद्धासारख्या अस्थिर परिस्थितीचा परिणाम भारतावर होऊ शकतो, अशी मला भीती वाटते. गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून, म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद भूषवल्यापासून, त्यांच्या धोरणात एक विशिष्ट बदल दिसून आला आहे. भारताविरुद्ध त्यांचा एक विशिष्ट दृष्टिकोन, आकस आहे.
भारत देशावर टीका करणे, दबाव आणण्याचे प्रयत्न करणे, अशा प्रकारचे वर्तन मी निरीक्षणात घेतले आहे. आशिया खंडात हळूहळू पसरत असलेली ही अशांती जाणीवपूर्वक करण्यात येत असल्याची शंका मनात येते. अशा परिस्थितीत, देशाला लाभलेले आपले सक्षम नेतृत्व, म्हणजेच आपण, यावरच हल्ला होण्याची शक्यता व आहे. अलीकडच्या काळातील वैमनस्य आणि अचानक येणार्या मैत्रीच्या हाताच्या मागे काहीतरी दडलेले असू शकते. कोणत्याही प्रकारची सुरक्षा चूक होऊ नये अशी विनंती वजा सूचना जितेंद्र जैन यांनी पत्रातून केली आहे आहे.