Prime Minister Narendra Modi will inaugurate the multi-level metro line along Samruddhi Highway in Nagpur | Loksatta

एकाच ठिकाणी रस्ता, रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, मेट्रो; देशातील पहिल्या बहुस्तरीय वाहतूक सुविधेचे पंतप्रधान करणार नागपूरमध्ये लोकार्पण

विशेष म्हणजे या पैकी एक मेट्रोचा कामठी मार्गावरील चार-स्तरीय वाहतूक प्रकल्प आहे. हा अशा प्रकारची एकमेव असल्याचा दावा केला जात आहे.

एकाच ठिकाणी रस्ता, रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, मेट्रो; देशातील पहिल्या बहुस्तरीय वाहतूक सुविधेचे पंतप्रधान करणार नागपूरमध्ये लोकार्पण
देशांतील पहिल्या बहुस्तरीय वाहतूक सुविधेचे पंतप्रधान करणार लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ डिसेंबर रोजी नागपुरातील समृद्धी महामार्गासह मेट्रोच्या कस्तूरचंद पार्क ते ऑटोमोटिव्ह चौक आणि झाशी राणी चौक ते प्रजापती नगर मेट्रो मार्गाचे लोकार्पण करणार आहे. विशेष म्हणजे या पैकी एक मेट्रोचा कामठी मार्गावरील चार-स्तरीय वाहतूक प्रकल्प आहे. हा अशा प्रकारची एकमेव असल्याचा दावा केला जात आहे.

हेही वाचा- दुर्मिळ योग; ८ डिसेंबरला ‘मंगळ’ पृथ्वीच्या जवळ येणार, आणि…

सद्यस्थितीतील वाहतूक आणि पादचारी भुयारी मार्ग हा सर्वात खालचा स्तर आहे. तर त्याच्या वरती असलेला रेल्वे ट्रॅक हा दुसरा स्तर आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि मेट्रो मार्ग अनुक्रमे तिसरा आणि चौथा स्तर आहे. तो एकूण ५.३ किमी असेलल्या आशियातील सर्वात लांब डबल-डेकर व्हायाडक्टचा भाग आहे. गड्डीगोदाम रेल्वे क्रॉसिंगवर जिथून दररोज १५० हून अधिक रेल्वे आणि एक लाखाहून अधिक वाहने जातात त्यावरती लोखंडे पुल उभारला आला आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 14:41 IST
Next Story
रानटी हत्तींचे ‘अपडाऊन’ सुरूच: भंडारा जिल्ह्यातून पुन्हा गोंदियात परतले; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण