नागपूर: मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवणे आणखी सोपे झाले आहे. यासाठी आता मंत्रालय वा नागपुरातील कार्यालयात येण्याची गरज भासणार आहे. सीएमएमआरएफ या अँप्लिकेशनवर अर्ज भरून मदत मिळविता येते. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने १४ महिन्यात १३ हजाराहून अधिक गोरगरीब रुग्णांना एकूण ११२ कोटी १२ लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नागपूरची प्रसिद्ध काळी, पिवळी मारबत कशी तयार होते? ३० फूट उंच, बांबू, खरडे आणि बरेच काही..

जुलै- २०२२ मध्ये राज्यात १७८ रुग्णांना ७६ लाखांची मदत केली गेली. ऑगस्ट २०२२ मध्ये २४४ रुग्णांना १ कोटी १ लाख, सप्टेंबर- २२ मध्ये ३१९ रुग्णांना १ कोटी ८६ लाख, ऑक्टोबर- २२ मध्ये २७६ रुग्णांना २ कोटी ३५ लाख, नोव्हेंबर- २२ मध्ये ५२७ रुग्णांना ४ कोटी ५० लाख, डिसेंबर- २२ मध्ये १०३१ रुग्णांना ८ कोटी ५२ लाख, जानेवारी- २३ मध्ये १,०३२ रुग्णांना ८ कोटी ९० लाख, फेब्रुवारी- २३ मध्ये १,२७४ रुग्णांना १० कोटी ५९ लाख, मार्च- २३ मध्ये १,४६९ रुग्णांना ११ कोटी ९३ लाख, एप्रिल- २३ मध्ये १,१९० रुग्णांना ९ कोटी ९१ लाख, मे- २३ मध्ये १,३२९ रुग्णांना ११ कोटी २५ लाख, तर जून- २३ मध्ये १,७२८ रुग्णांना १४ कोटी ६२ लाख, जुलै- २३ मध्ये १,४८८ रुग्णांना १२ कोटी ७२ लाख, तर ऑगस्ट- २३ मध्ये १,५६७ रुग्णांना १३ कोटी १४ लाख, रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. गोरगरीब गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून अर्थसहाय्य केले जाते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Process to get financial aid for medical from cm relief fund made easy mnb 82 zws