बुलढाणा : पोलीस प्रशासनाच्या नियोजनाअभावी आळंदी येथे वारकऱ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा वारकरी सेनेने अभिनव पद्धतीने निषेध केला. टाळ मृदंगाच्या गजरात येथील जयस्तंभ चौकात प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – ‘ओबीसी’वरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये कलगीतुरा

वारकऱ्यांवरील लाठीहल्ल्याचे पडसाद बुलढाण्यात उमटले. शहरातील जयस्तंभ चौकात वारकरी सेना, वारकरी महामंडळ तसेच असंख्य शिवसैनिकांनी टाळ मृदुंगाच्या गजरात तसेच विठू माऊलींचा जयघोष करत पोलीस प्रशासनाचा निषेध केला. या आंदोलनात युथ फाउंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज गायकवाड, शिवसेना तालुका प्रमुख धनंजय बारोटे, शहरप्रमुख गजेंद्र दांदडे, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत गायकवाड, विजय जायभाये, मोहन पऱ्हाड, उमेश कापुरे, गोविंदा खुमकर, राजेश महाराज मुंगळे, वारकरी महामंडळाचे विदर्भ अध्यक्ष राजेंद्र महाराज तळेकर, तालुकाध्यक्ष शरद महाराज काळे, खोरे महाराज, दांडगे महाराज, ज्ञानेश्वर पवार महाराज, हभप सातपुते महाराज, हभप विश्वास महाराज पवार, सांडू पाटील, कचोरे, दीपक तुपकर, निलेश पाटील, शंकर जाधव, श्रीकृष्ण शिंदे, विठ्ठल माऊली, आदी सहभागी झाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protest in buldhana against attack on warkari alandi scm 61 ssb