राणा दाम्पंत विरुद्ध राष्ट्रवादी ; एकाच दिवशी आणि एकाच मंदिरात हनुमान चालिसा पठन करणार 

राष्ट्रवादी शहर काँग्रेस याच मंदिरात दुपारी १२ ते दोन च्या सुमारास हनुमान चालिसा पठन आणि हवन करणार आहेत.

राजेश्वर ठाकरे, लोकसत्ता

नागपूर : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा, त्याचे पती आमदार रवी राणा आणि राष्ट्रवादी शहर काग्रेस नागपुरात एकाच दिवशी आणि एकाच हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठन करणार आहेत. त्यामुळे हनुमान चालिसा निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस आणि युवा स्वाभिमानी पार्टीचे कार्यकर्ते समोरासमोर येणार असून २८ मे रोजी नागपुरात राणा दाम्पत्य विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना रंगण्याची शक्यता आहे. नवनीत राणा यांच्या कार्यकर्त्यांनी आज पत्रकार परिषद घेवून राणा यांच्या २८ मे रोजीच्या नागपुरातील कार्यक्रमाची माहिती दिली. त्या बाजी प्रभु चौक, रामनगर येथील हनुमान मंदिरात दुपारी एक ते चार दरम्यान हनुमान चालिसा पठन करतील आणि उपस्थितांना हनुमान चालिसा पुस्तिका वाटप करतील. दुसरीकडे राष्ट्रवादी शहर काँग्रेस याच मंदिरात दुपारी १२ ते दोन च्या सुमारास हनुमान चालिसा पठन आणि हवन करणार आहेत. राष्ट्रवादीने अंबाझरी पोलिसांना यासंदर्भात पत्राद्वारे कळवले आहे. तर युवा स्वाभिमानी पार्टीने पोलीस आयुक्तांकडे कार्यक्रमासाठी परवानगी मागितली आहे. या दोन्ही कार्यक्रमांना परवानगी मिळालेली नाही. दरम्यान दोन्ही पक्षाने राज्यघटनेने धार्मिक स्वातंत्र्य दिल्याचे सांगून प्रार्थना करण्यासाठी कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नसल्याची भूमिका घेतली आहे.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rana couple and ncp workers read hanuman chalisa in same temple in nagpur zws

Next Story
मुख्याधिकाऱ्याच्या घरातून ५.२२ लाखांची रोकड जप्त ;  अतिक्रमण काढण्यासाठी एक लाखाची लाच प्रकरण
फोटो गॅलरी