आईशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधाचा युवकाने गैरफायदा घेत तिच्या १६ वर्षीय मुलीवर बलात्कार केला. ही घटना पारडीत उघडकीस आली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी ३८ वर्षीय महिला तिच्या १६ वर्षीय मुलगी रिया (काल्पनिक नाव) आणि २० वर्षीय मुलासह राहते. तिच्या पतीने निधन झाले आहे. आरोपी विनोद (३३, पारडी) याच्याशी रियाच्या आईची ओळख झाली. त्यातून दोघांची मैत्री झाली. विनोदचे नेहमी घरी येणे-जाणे वाढले. तो मैत्रिणीला पैसे देऊ लागला. वारंवार घरी येत असताना त्याची वाईट नजर मैत्रिणीची मुलगी रियावर पडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>नागपूर : ऐन सणासुदीत भेसळयुक्त अन्नपदार्थांचा पुरवठा !, सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

गेल्या काही दिवसांपासून तो रियाशी जवळिक साधण्याचा प्रयत्न करीत होता. आईचा मित्र असल्यामुळे रिया शांत होती. त्यामुळे त्याची हिंमत वाढली. तो रियाशी लगट करीत होता. तिला मोबाईलवर संदेश पाठवत होता. परंतु, त्याकडे ती दुर्लक्ष करीत होती. विनोदच्या कृत्यामुळे रिया त्रस्त झाली होती. परंतु, आईला वाईट वाटू नये म्हणून ती सहन करीत होती.गेल्या आठवड्याभरापासून तो तिला शारीरिक संबंधाची मागणी करीत होता. परंतु, ती त्याला नकार देत होती. मंगळवारी दुपारी एक वाजता विनोदने रियाला फोन केला. ‘तुझ्या आईचे पैसे द्यायचे आहे. त्यामुळे तू माझ्या घरी ये.’ असे सांगितले. रिया नेहमीप्रमाणे त्याच्या घर गेली. विनोदने रिया घरात येताच दार बंद केले आणि शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार दिला. मात्र, त्याने बळजबरी करत तिच्यावर बलात्कार केला.

हेही वाचा >>>नागपूर : जेरबंद बिबट्याने घेतला मोकळा श्वास

तासाभरानंतर ती घरी गेली. रात्री आठ वाजता तिची आई घरी आली. तिने विनोदने केलेल्या कृत्याबाबत आईला सांगितले. मायलेकी लगेच पोलीस ठाण्यात पोहचल्या. पोलिसांनी तक्रारीवरुन गुन्हा दाखल करीत विनोदला अटक केली. न्यायालयाने विनोदला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rape of a minor girl amy