यवतमाळ: यवतमाळ येथे आज, शनिवारी संभाजी भिडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यादरम्यान काही पुरोगामी संघटनांनी बळवंत मंगल कार्यालय येथे कार्यक्रमस्थळी भिडेंविरोधात घोषणाबाजी करून बॅनर फाडले. शहरातही अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी भिडे यांच्या कार्यक्रमाचे बॅनर फाडले. यावेळी हिंदुत्ववादी आणि पुरोगामी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
पोलिसांनी कार्यक्रमस्थळावरून प्रहार संघटनेचे बिपिन चौधरी, सामाजिक संघटनांचे समन्वयक प्रा. घनश्याम धरणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यवतमाळतील भिडे यांच्या कार्यक्रमास विरोध होण्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी यवतमाळ येथे मोठा बंदोबस्त ठेवला आहे.
First published on: 29-07-2023 at 11:42 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sloganism of progressive activists at sambhaji bhide venue police custody nrp 78 ysh