अकोला : जिल्ह्यातील जनावरांमध्ये ‘लम्पी’ प्रादुर्भाव वाढत आहे. आता शहरातदेखील ‘लम्पी’बाधित जनावर आढळून आले. शहरातील हिंगणा मार्ग परिसरातील एका नर वासरात ‘लम्पी’ त्वचारोगाची बाधा झाली. त्यामुळे संसर्ग केंद्रापासून दहा किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आले आहे. त्याचा आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी विजय पाटील यांनी आज निर्गमित केला.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जंतुकीकरण करून परिसरात जनावरांची खरेदी व विक्री, वाहतूक, बाजार, जत्रा व प्रदर्शन आयोजित करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. संसर्ग केंद्राच्या पाच कि.मी. परिघातील जनावरांना गोट पॉक्स लसीकरण १०० टक्के पूर्ण यावे, असे आदेश पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय यंत्रणेला देण्यात आले आहेत.
First published on: 21-09-2023 at 13:31 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Steady increase in lumpi outbreak in akola ppd 88 ssb