भंडारा :Kunbi Organizations in Vidarbha मराठा समाजाला ओबीसीत त्यातही कुणबी समाजात समाविष्ठ केल्यास सर्व ओबीसी क्रांति मोर्चा पदाधिकारी वैनगंगा नदित उडी घेऊन सामूहिक आत्महत्या करू असा इशारा ओबीसी क्रांति मोर्चा वतीने देण्यात आला आहे. ओबीसी क्रांति मोर्चाचे संयोजक संजय मते यांनी हा इशारा दिला आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिल्यास हरकत नसल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.
शिंदे सरकारने कुणबी समाजात मराठा समाजाला स्थान देण्याच्या हालचाली सुरु केल्यावर याला ओबीसी नेत्यांकडून विरोध वाढत चालला आहे. या विरोधाच्या लढाईत आता भंडारा ओबीसी क्रांति मोर्चाने उड़ी घेतली असून मराठा समाजाला ओबीसीत त्यातही कुणबी समाजात समाविष्ठ केल्यास सर्व ओबीसी क्रांति मोर्चा पदाधिकारी वैनगंगा नदित उडी घेऊन सामूहिक आत्महत्या करतील असा इशारा दिला आहे. ओबीसी क्रांति मोर्चा संयोजक संजय मते यांनी सांगितले की, ओबीसी प्रवर्गात साडे चारशेच्या वर जाती समाविष्ठ आहे.
हेही वाचा >>> खबरदार..! मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिल्यास…; विदर्भातील कुणबी संघटना आक्रमक
सत्तरि ओलंडली तरी ओबीसी समाजाचा अजून विकास झाला नाही. आता पुन्हा मराठा समाजाची भर पडणे ओबीसी समाजाचा परवडणारे नाही. शिंदे सरकारला ओबीसी समाजाकडे लक्ष द्यायला वेळ नसताना कोणत्या अधिकाराने ओबीसी समाजात मराठा समाजाला आरक्षण देताय असा परखड़ सवाल ही त्यांनी केला आहे. सरकारने आपल्या भूमिकेचा पुनर्विचार न केल्यास ओबीसी समाज कधीही शिंदे सरकारला माफ करणार नसून पुढील निवडणुकीत सत्ता पक्षाला याचे परिणाम भोगावे लागतील असा इशाराही देण्यात आला आहे.निवडणुकीच्या तोंडावर सरकार जाणीवपूर्वक ओबीसी आणि मराठा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असून सरकारचा हा डाव असल्याचा आरोपही मते यांनी केला आहे.
