गडचिराेली : आवडते टीव्ही चॅनेल पाहू न दिल्याने माेठ्या बहिणीशी वाद घातला. त्यानंतर घराच्या मागील बाजूस असलेल्या झाडावर गळफास लावून दहा वर्षीय मुलीने आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना काेरची तालुक्याच्या बाेडेना गावात आज गुरुवार, २२ मे राेजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली. सोनाली आनंद नराेटे (१०, रा. बाेडेना, ता. काेरची), असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे.

आज सकाळी संध्या (१२), साेनाली व तिचा भाऊ साैरभ (८) हे तिघेही टीव्ही पाहत हाेते. दरम्यान, आवडते चॅनेल पाहण्यावरून व रिमाेट ताब्यात घेण्यावरून माेठी बहीण संध्या हिच्याशी साेनालीचे भांडण झाले. ‘माझे आवडते चॅनेल पाहू दिले नाही’ असे म्हणत रिमाेट ताब्यात घेण्यावरून साेनालीचा राग अनावर झाला. त्यानंतर तिने रागाच्या भरात घराच्या मागील बाजूस असलेल्या पेरूच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. माहिती मिळताच कोरचीचे पोलीस निरीक्षक शैलेश ठाकरे, सहायक पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. मृतदेह कोरची ग्रामीण रुग्णालयात पाठविला. तेथे डॉ. राहुल राऊत यांनी शवविच्छेदन केले.

आश्रमशाळेत घेत हाेती शिक्षण

सोनाली, संध्या व तिचा भाऊ सौरभ हे तिघेही गोंदिया जिल्ह्यातील कोकना (खोबा) गावातील एका खासगी आश्रम शाळेत शिकतात. उन्हाळी सुट्ट्या असल्याने ते घरी आले हाेते. वडिलांचे निधन झाल्याने सर्वात लहान भाऊ शिवम आईजवळ राहताे.

…..प्रतिक्रिया…

मुलीने आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. सखाेल चाैकशीनंतरच आत्महत्येचे कारण समोर येईल. तपास सुरू आहे. मुकूंद देशमुख, सहायक पाेलीस निरीक्षक, काेरची.