The country towards to destruction Economist Prof Criticism Desarada ysh 95 | Loksatta

यवतमाळ : देशाची वाटचाल विनाशाकडे; अर्थतज्ज्ञ प्रा. देसरडा यांची टीका

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना देशातील ७५ टक्के जनता हलाखीचे जीवन जगत आहे.

यवतमाळ : देशाची वाटचाल विनाशाकडे; अर्थतज्ज्ञ प्रा. देसरडा यांची टीका
अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा

यवतमाळ : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना देशातील ७५ टक्के जनता हलाखीचे जीवन जगत आहे. यासाठी आजी-माजी राज्य व केंद्र सरकारची धोरणे जबाबदार असून देशाची वाटचाल विनाशाकडे सुरू असल्याची टीका अर्थतज्ज्ञ तथा महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य प्रा. एच.एम. देसरडा यांनी केली.

हेही वाचा >>> चंद्रपूर : वृद्ध शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, अतिक्रमण काढण्यासाठी वनविभागाचा दबाव?

हेही वाचा >>> Maharashtra Breaking News Live : देशपातळीवर राज्यात ठाणे महापालिकेचा तिसरा क्रमांक; राज्यातील इतर महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..

येथील सावित्री ज्योतिराव फुले समाजकार्य महाविद्याोलयात आज, रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जनजळवळीचे प्रतिनिधी म्हणून प्रा. देसरडा कन्याकुमारीपासून तामिळनाडू, केरळ येथे भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. पदयात्रेदरम्यान आठ विद्यापीठ व संशोधन संस्थेत त्यांची व्याख्याने झालीत. आर्थिक विषमता, सामाजिक विसंवाद, पर्यावरणीय विध्वंस या आजच्या प्रमुख तीन समस्या आहेत. हवामान अरिष्ट व महामारीने धोक्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. सौर ऊर्जा, जैव ऊर्जा ही स्वस्त, शीघ्र व सुरक्षित पर्याय आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे महारस्ते, इथेनॉल व अन्य प्रकल्प हे पूर्णत: अनाठायी असून विनाशाकडे नेणारे आहेत, असा आरोप यावेळी प्रा. देसरडा यांनी केला.

हेही वाचा >>> नागपूर : स्मार्ट सिटीच्या कामातून ‘शापूरजी’ला वगळले; कामात दिरंगाई भोवली

यवतमाळसह विदर्भात कापसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. मात्र, उद्योग उभारणीसाठी कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही. सत्ताधाऱ्यांना टक्केवारी कुठून मिळेल यातच रस आहे, असेही ते म्हणाले. गांधी-फुले-आंबेडकरांना अभिप्रेत असा विकास झाला नाही. भारताचे संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी प्रस्थापिंतांविरोधात जनतेने एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले. पत्रकार परिषदेला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश शिर्के आदी उपस्थित होते.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
खरगे हायकमांडचा पाठिंबा असलेले उमेदवार आहेत का? शशी थरूर म्हणाले, “मी राहुल-प्रियंका गांधींशी बोललो, त्यांनी…”

संबंधित बातम्या

उपमुख्यमंत्र्यांनी सारथ्य केलेल्या गाडीचा मालक विक्की कुकरेजा कोण आहे?
समृद्धी महामार्गाचा पाहणी दौरा: उपमुख्यमंत्र्यांनी चालवलेल्या वाहनाच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राच्या वादानंतर झटपट नूतनीकरण
“शिवरायांचा जन्म कोकणात’ प्रसाद लाड यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
काय त्या गाड्या… काय त्यांचा वेग!; मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची एकच चर्चा
…तर शिवसेनेचे ५० टक्के आमदार स्वगृही परततील – खासदार धानोरकराचं विधान!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
‘तेरा प्यार प्यार प्यार हुक्का….’ भर लग्नमंडपातच नवरा-नवरीला चढली झिंग, स्टेजवरच किस केलं अन्…; भन्नाट Viral Video पाहून चक्रावाल
Video : बायकोची दहशत, मराठी अभिनेत्रीने रागाने बघताच नवरा भांडी घासू लागला अन्…; व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू होईल अनावर
Laptop खराब होण्याची चिंता विसरा; स्वच्छ करताना वापरा ‘या’ सोप्या टिप्स
‘मिर्झापूर’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच येणार सीजन ३; अभिनेत्याने दिले संकेत
“सलमानच्या गाडीला…” अतरंगी ड्रेसमुळे धडपडणाऱ्या उर्फीला पाहून नेटकऱ्याची कमेंट